ठळक मुद्देबिग बॉस 13 मध्ये प्रियांक गेस्ट म्हणून सहभागी झाला होता.

बिग बॉस 11’ मध्ये दिसलेल्या दोन स्टार्सनी अखेर एकमेकांवरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिलीय. होय, प्रियांक शर्मा व बेनाफ्शा सुनावाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी आपले प्रेम जगापासून लपवून ठेवले. पण आता मात्र सोशल मीडियावर दोघांनीही आपले प्रेम जगजाहिर केलेय.  बेनाफ्शाने प्रियांकला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

‘मला तुझ्याशिवाय अन्य कुणीही आनंदात ठेवू शकत नाही. बिनशर्त प्रेम...,’ असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.
प्रियांक व बेनाफ्शाच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरे तर गतवर्षी मे महिन्यात प्रियांक व बेनाफ्शा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. याचे कारण होते प्रियांकची नताशा स्तांकोव्हिकसोबतची वाढती जवळीक. यानंतर प्रियांकने बेनाफ्शाला सोशल मीडियावर अनफॉलोही केले होते. पण आता कदाचित दोघांमध्येही सर्वकाही ठीक झाले आहे.

बिग बॉस 11 दरम्यान प्रियांक व बेनाफ्शा यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. बिग बॉसच्या घरात हे दोघे अनेकदा एकमेकांना किस करताना दिसले होते. अर्थात याऊपरही  आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

बिग बॉस 13 मध्ये प्रियांक गेस्ट म्हणून सहभागी झाला होता. एका टास्कसाठी तो बिग बॉसच्या घरात गेला होता. 
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर प्रियांक अलीकडे हिना खानसोबत एका म्युझिक व्हिडीओत दिसला होता. या व्हिडीओतील दोघांची केमिस्ट्री चांगलीच चर्चेत होती.  रोडिज रायजिंग आणि स्प्लिट्सविला 10 यासारख्या शोमध्येही तो दिसला होता.

Web Title: priyank sharma and benafsha soonawalla made their relationship official on instagram-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.