neha kakkar and indian idol 11 host aditya narayan wedding will make udit narayan happy |  नेहा-आदित्यचे लग्न अन् नारायण कुटुंबाचा ‘लाभ’; वाचून पडाल चाट

 नेहा-आदित्यचे लग्न अन् नारायण कुटुंबाचा ‘लाभ’; वाचून पडाल चाट

ठळक मुद्देबॉलिवूडची गायिका नेहा कक्कर सध्या 'इंडियन आयडल' जज करताना दिसतेय.

‘इंडियन आयडल 11’ हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो सध्या कंटेस्टंटच्या गाण्यांमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणाने गाजतोय. होय, शोची जज नेहा कक्कर आणि शोचा होस्ट आदित्य नारायण यांच्यात खुल्लमखुल्ला सुरु असलेले फ्लर्ट चर्चेचा विषय बनला आहे. अलीकडे आदित्यचे डॅड उदित नारायण यांनी पत्नीसह या शोमध्ये हजेरी लावली होती.

आश्चर्य म्हणजे, यावेळी दोघांनीही नेहाला ‘होने वाली बहू’ म्हणून पसंत केले होते. केवळ इतकेच नाही तर नेहा सुद्धा आदित्यच्या मम्मीला ‘सासू मां’ म्हणताना दिसली होती. अर्थात ही सगळी गंमत होती. पण आता कदाचित उदित नारायण नेहाला आपली सून बनवण्याची निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. यातला एक फायदाही त्यांनी शोधून काढला आहे.

होय, नवभारत टाईम्सशी बोलताना उदित नारायण नेहा व आदित्यच्या लग्नाबद्दल बोलले. यावर त्यांचे उत्तर ऐकून सगळेच चाट पडले. ‘नेहा कक्कर खूप प्रेमळ मुलगी आहे. मला ती आवडते. मी खरोखर तिला लाईक करतो. इतक्या लहान वयात तिने खूप मोठे नाव कमावले आहे. नेहा व आदित्यची जोडी चांगली दिसले, याऊपर मला काहीही माहित नाही. पण भविष्यात हे लग्न झालेच तर माझा फायदा निश्चित आहे. होय, या लग्नानंतर आमच्या घरात एक फिमेल सिंगर सामील होईल.आमच्या घरातील फिमेल सिंगरची कमतरता भरून निघत असेल तर तो माझा मोठा फायदा असेल,’असे उदित नारायण म्हणाले.
एकंदर काय तर उदित नारायण ‘राजी’ आहेत. आता नेहा-आदित्य राजी होतात का ते बघूच.

Web Title: neha kakkar and indian idol 11 host aditya narayan wedding will make udit narayan happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.