ठळक मुद्देयेत्या 14 फेबु्रवारीला नेहू व आदित्य लग्न करणार आहेत.

बॉलिवूडची सुपरस्टार सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. इंडियन आयडल 11 च्या सेटवर दोघांच्याही लग्नाचे इव्हेंटही सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नेहा-आदित्यचे कुटुंबीय इंडियन आयडलच्या सेटवर भेटले, लग्नाची बोलणी झाली, तारीखही ठरली. त्यानुसार येत्या 14 फेबु्रवारीला नेहू व आदित्य लग्न करणार आहेत. काल इंडियन आयडलच्या सेटवरच आदित्यने नेहाला ‘शगुन की चुन्नी’ दिली, सोबत बॅचलर पार्टीही केली. यापुढची बातमी म्हणजे, नेहा व आदित्य गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे म्हटले जात आहेत. गोव्याच्या बीचवरचे दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. साहजिकच दोघांचेही चाहते आनंदात आहेत. तुम्हीही हे फोटो पाहून आनंदाने बेभान झाले असाल तर जरा थांबा... कारण हे फोटो नेहा व आदित्यच्या डेस्टिनेशन वेडिंगचे नसून त्यांच्या नव्या गाण्याच्या शूटींगचे आहेत.


होय, नेहा व आदित्यचे हे सिंगल येत्या 10 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.  नेहाचा भाऊ टोनी कक्कर याने हे सिंगल कंपोज केले आहे. या गाण्याचे शूट गोव्यात झालेत. त्याचेच फोटो  नेहा आणि आदित्य यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि हेच फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

 नवभारत टाईम्सशी बोलताना उदित नारायण नेहा व आदित्यच्या लग्नाबद्दल बोलले होते. ‘नेहा कक्कर खूप प्रेमळ मुलगी आहे. मला ती आवडते. मी खरोखर तिला लाईक करतो. इतक्या लहान वयात तिने खूप मोठे नाव कमावले आहे. नेहा व आदित्यची जोडी चांगली दिसले, याऊपर मला काहीही माहित नाही. पण भविष्यात हे लग्न झालेच तर माझा फायदा निश्चित आहे. होय, या लग्नानंतर आमच्या घरात एक फिमेल सिंगर सामील होईल.आमच्या घरातील फिमेल सिंगरची कमतरता भरून निघत असेल तर तो माझा मोठा फायदा असेल,’असे उदित नारायण म्हणाले होते.


 आता नेहा व आदित्य खरच लग्न करतात की, आदित्य निव्वळ नेहाशी फ्लर्ट करतोय, हे लवकरच कळेल. तोपर्यंत व्हायरल झालेले हे फोटो तुम्ही पाहू शकता.

Web Title: neha kakkar aditya narayan shoot for a song amid wedding rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.