NCB seek custodial interrogation of Bharti Singh Haarsh Limbachiyaa and cancellation of bail | भारती सिंह आणि हर्षच्या अडचणी वाढणार, NCB पुन्हा ताब्यात घेण्याच्या तयारीत

भारती सिंह आणि हर्षच्या अडचणी वाढणार, NCB पुन्हा ताब्यात घेण्याच्या तयारीत

कॉमेडिअन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या ड्रग्स प्रकरणी अडचणी वाढताना दिसत आहेत. नोव्हेंबरमध्ये दोघांनी ८६.५ ग्रॅम गांजासह अटक केली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसांनी जामीन मिळाला होता. आता रिपोर्ट्स आहे की, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो त्याचा जामीन कॅन्सल करण्याच्या तयारीत आहे.

टाइम्स नाउच्या ट्विनुसार, एनसीबीने स्पेशल NDPS कोर्टात जाऊन त्यांचा जामीन कॅन्सल करणे आणि कस्टडीमध्ये घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये एनसीबीने भारतीच्या मुंबईतील घरी छापा मारला होता. भारती आणि तिचा पती हर्ष दोघेही ड्रग्स घेतल्याप्रकरणात दोषी आढळले होते. एनसीबीने दोघांना अटक केली होती. (हर्षने पत्नी भारतीसोबतचा रोमॅंटिक फोटो केला शेअर, टोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...)

भारती-हर्ष गांजा ओढल्याचं केलं होतं मान्य

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं होतं. या चौकशीच्या क्रमात भारती आणि हर्षला अटक करण्यात आली होती. त्यांना NDPS अॅक्टनुसार, गांजा ठेवणे आणि घेण्यासाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. एनसीबीने सांगितले होते की, भारती आणि हर्षने गांजा घेतल्याचं कबूल केलं होतं.

भारतीला अटक झाल्यावर सोशल मीडियातून तिला ट्रोलचा सामना करावा लागला होता. हर्षने इन्स्टाग्रामवर भारतीसोबतचा फोटो शेअर केला होता. यावर लोकांनी दोघांनाही चांगलंच ट्रोल केलं. तर हर्षने अनेक ट्रोलर्सना उत्तरही दिलं आहे. आता त्यांच्या अडचणी अजून वाढणार की कमी होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: NCB seek custodial interrogation of Bharti Singh Haarsh Limbachiyaa and cancellation of bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.