Bharti Singh and husband Haarsh trolled after posting photo social media | हर्षने पत्नी भारतीसोबतचा रोमॅंटिक फोटो केला शेअर, टोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

हर्षने पत्नी भारतीसोबतचा रोमॅंटिक फोटो केला शेअर, टोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांना भलेही जामीन मिळाला असली तरी लोकांच्या मनात त्यांच्या विषयी राग बघायला मिळत आहे. हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर पत्नी भारती सिंहसोबतच एक फोटो शेअर केलाय. या फोटोला त्याने एक कॅप्शनही दिलं आहे. पण असं वाटतंय की, लोकांनी अजून भारती आणि हर्षला माफ केलेलं नाही. फोटो शेअर केल्यावर भारती आणि हर्षला ट्रोलचा सामना करावा लागला. यादरम्यान हर्षने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.

हर्षने सोशल मीडियावर भारतीसोबतचा एक रोमॅंटिक पोज असलेला फोटो शेअर केला होता. याला त्याने कॅप्शन लिहिल होतं की, जेव्हा आपण सोबत असतो तेव्हा कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. या पोस्टवर तशा तर अनेक चांगल्या कमेंट्स आहेत, पण असेही काही लोक आहेत ज्यांनी भारती आणि हर्षला ट्रोल केलं आहे. कुणी भारती आणि हर्षला बॉयकॉट करण्याचं बोलत आहे तर कुणी थेट द कपिल शर्मा शो बॉयकॉट करण्याबाबत बोलत आहे. पण हर्ष सुद्धा गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. जेव्हा एकाने भारतीला बॉयकॉट करण्याची कमेंट केली तर हर्षने त्या यूजरला म्हणाला - 'आता झोपा काका'. (भारतीला कृष्णा अभिषेकचा सपोर्ट, म्हणाला - ती माझी बहीण, दुसरा चान्स मिळायला हवा...)

एका दुसऱ्या व्यक्तीने हर्षला ड्रग्स अ‍ॅडिक्ट म्हटलं. यावर हर्ष भडकला आणि सडेतोड उत्तर दिलं. पण असं नाही की, भारती आणि हर्षच्या या फोटो सर्वांनीच ट्रोल केलं. प्रियंका शर्मा, सिखा सिंह, करण सिंह छाबडासहीत अनेक स्टार्सनी कपलचं कौतुक केलं आहे. त्यासोबत द कपिल शर्मा शोमध्ये काम करणाऱ्या कृष्णा अभिषेकने सुद्धा भारतीला सपोर्ट केला. ती माझी बहीण असून मी नेहमी तिच्या पाठीशी उभा असेल असं तो म्हणाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bharti Singh and husband Haarsh trolled after posting photo social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.