Watch Video : मोना सिंगने चाहत्यांना दिले ‘बिग सरप्राईज’, शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 03:18 PM2020-01-28T15:18:31+5:302020-01-28T15:18:41+5:30

Mona Singh and Shyam Gopalan's Wedding : मोनाच्या लग्नाला एक महिना पूर झाला. या सेलिब्रेशनचा आनंद चाहत्यांसोबत शेअर करत मोनाने लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

mona singh shares a video OF her wedding ON one month anniversary | Watch Video : मोना सिंगने चाहत्यांना दिले ‘बिग सरप्राईज’, शेअर केला खास व्हिडीओ

Watch Video : मोना सिंगने चाहत्यांना दिले ‘बिग सरप्राईज’, शेअर केला खास व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देमोना सिंग लवकरच आमीर खान व करीना कपूरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकणार आहे.

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग गत 27 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकली. काल मोनाच्या लग्नाला एक महिना पूर झाला. अशात सेलिब्रेशन तर बनतेच.  या सेलिब्रेशनचा आनंद चाहत्यांसोबतही शेअर करत मोनाने लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वधूच्या पोशाखात मोना प्रचंड आनंदी आणि तितकीच सुंदर दिसतेय.
-आणि एक महिनाही झाला. गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी लग्न झाले होते. हॅपी फर्स्ट मंथ अ‍ॅनिवर्सरी.... असे लिहित मोनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.


मोनाने 27 डिसेंबरला तिने आपल्या बॉयफ्रेंड श्यामसोबत लग्नगाठ बांधली होती. पण हा लग्नसोहळा अतिशय खासगी ठेवला होता. केवळ तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय एवढेच या लग्नाला हजर होते. अर्थात या लग्नाचे काही फोटो तिने शेअर केले होते. आता मात्र तिने लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांसाठी हे एक मोठे सरप्राईज आहे, असे मानायला हरकत नाही.   


 मोनाच्या नव-याबद्दल सांगायचे झाल्यास तो साऊथ इंडियन बँकर आहे. मोनाला ‘जस्सी जैसी कोई नहीं’या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो व कवच खाली शक्तियों से या मालिकेत ती दिसली.


मोना सिंग लवकरच आमीर खान व करीना कपूरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकणार आहे. याशिवाय सध्या एकता कपूरच्या एका वेबसीरिजमध्येही ती काम करतेय. मोनाच्या लग्नासाठी या वेबसीरिजच्या शूटींगचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. 

Web Title: mona singh shares a video OF her wedding ON one month anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.