जेव्हा झी मराठी अवॉर्ड्समध्ये कंगना राणावत अवतरते !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 05:02 PM2021-10-22T17:02:15+5:302021-10-22T17:07:54+5:30

बॉलिवूडमधील प्रचंड चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. तिच्या लोकप्रियते इतकीच तिची सगळीकडे चर्चा असते.

This mimicry from Shreya Bugade of Kangana Ranaut in Zee Marathi Awards made everyone surprised that it's Kangana herself, check | जेव्हा झी मराठी अवॉर्ड्समध्ये कंगना राणावत अवतरते !

जेव्हा झी मराठी अवॉर्ड्समध्ये कंगना राणावत अवतरते !

googlenewsNext

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोनं अवघ्या महाराष्ट्राला हसवत मनोरंजन केलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी रसिकांवर चला हवा येऊ द्या या शोनं जादू केली आहे. या शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या विनोदवीरांमध्ये आणखी एक नाव आवर्जून घ्यावं लागेल. विनोदवीर पुरुषांमध्ये श्रेया बुगडे हिने आपल्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांच्या काळजात वेगळं स्थान मिळवलं आहे. महिला कॉमेडीयन म्हणून श्रेयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच श्रेया बुगडेबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात. सोशल मीडियावरही श्रेयाची बरीच चर्चा असते. तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात. पुन्हा एकश्रेया बुगडे चर्चेत आली आहे. 

बॉलिवूडमधील प्रचंड चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. तिच्या लोकप्रियते इतकीच तिची सगळीकडे चर्चा असते असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. नुकतंच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये देखील कंगनाने हजेरी लावल्याची चर्चा सुरु आहे. पण हे खरं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये कंगना नाही तर श्रेया बुगडेने एका स्किटमध्ये कंगनाची भूमिका साकारली. पण तिने इतकी हुबेहूब कंगना साकारली की, सगळ्यांना खरोखर मंचावर कंगनाच आहे कि काय. असा प्रश्न पडला, हे स्किट पाहताना तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांच्या हसून हसून डोळ्यात पाणी आलं आणि श्रेयाच्या मिमिक्रीचं सगळ्यांनी कौतुक देखील केलं. चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी सादर केलेल्या ह्या दिवाळी अधिवेशनात कंगना सोबत अनेक राजकारणी सहभागी होणार आहेत.

Web Title: This mimicry from Shreya Bugade of Kangana Ranaut in Zee Marathi Awards made everyone surprised that it's Kangana herself, check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.