Mere Sai's Abeer Soofi meets his 5-year-old fan on the occasion of Ramnavmi | 'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती 
'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती 

ठळक मुद्देसाई बाबांची भेट होईल या आशेने दिक्षा ‘मेरे साई’च्या सेटवर आली होती

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’ ही मालिकेेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेने नुकताच 400 एपिसोडचा टप्पा गाठला आहे. 

रामनवमीच्या प्रसंगी जेव्हा या मालिकेची एक गोंडस चाहती सेटवर आली तेव्हा या मालिकेबद्दलचे प्रेम आणि जिव्हाळा जाणवला. अबीरने लहान मुलांबरोबर ‘कंजक’ साजरे केले. 5 वर्षांची दिक्षा जी या मालिकेची चाहती आहे ती ’साई बाबांची भेट होईल या आशेने ‘मेरे साई’च्या सेटवर आली होती. छोट्या दिक्षाच्या आईने सांगितले की दीक्षा ही मालिका सुरू होण्याची वाट बघत असते. तिने पुढे सांगितले की, दिक्षा ‘मेरे साई’ मालिकेची जबरदस्त चाहती आहे. फक्त 3 वर्षांची असताना तिने तिच्या आजीबरोबर ही मालिका बघण्यास सुरुवात केली होती आणि आता अशी वेळ आली आहे की कोणी आठवण करून दिल्याशिवाय संध्याकाळी बरोबर 6.30 वाजता ती ‘मेरे साई’ बघण्यासाठी टीव्हीसमोर बसते. आपण ‘मेरे साई’ च्या सेटवर जात आहोत हे जेव्हा आम्ही तिला सांगितले तेव्हा ती खूश झाली. अबीर सूफीच खरे साई बाबा आहेत असे समजून दिक्षा त्यांच्याकडे एकटक बघत राहिली. तिच्यासाठी अबीरच खरे साई बाबा आहेत.''
 


Web Title: Mere Sai's Abeer Soofi meets his 5-year-old fan on the occasion of Ramnavmi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.