माझी तुझी रेशीमगाठ: आजोबांनी घेतला मृत्युपत्र करण्याचा निर्णय; कोणाच्या पदरात पडणार संपत्तीचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:40 PM2022-05-13T16:40:39+5:302022-05-13T16:41:04+5:30

Mazi tuzi reshimgath:यश मुंबईत आल्यापासून आजोबांनी सतत त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. तसंच यशने लग्न केल्यानंतरच आपण मृत्यूपत्र करणार असंही त्यांनी सांगितलं होतं.

mazi tuzi reshimgath aajoba decided to make a will | माझी तुझी रेशीमगाठ: आजोबांनी घेतला मृत्युपत्र करण्याचा निर्णय; कोणाच्या पदरात पडणार संपत्तीचा मोठा वाटा

माझी तुझी रेशीमगाठ: आजोबांनी घेतला मृत्युपत्र करण्याचा निर्णय; कोणाच्या पदरात पडणार संपत्तीचा मोठा वाटा

Next

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath). उत्तम कथानकासह कलाकारांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळेच या मालिकेत दररोज काय घडतं हे पाहायला प्रेक्षक आतुर असतात. सध्या या मालिकेत यश आणि नेहा यांच्या आयुष्यात एक वेगळाच ट्रॅक सुरु आहे. लग्न झालेलं नसतानाही ते नवरा-बायकोप्रमाणे राहत आहेत. केवळ आजोबांची प्रकृती स्थिर रहावी यासाठी ते हे नाटक करत आहेत. मात्र, आजोबांना हे नाटकच सत्य वाटत असून आता त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

यश मुंबईत आल्यापासून आजोबांनी सतत त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. तसंच यशने लग्न केल्यानंतरच आपण मृत्यूपत्र करणार असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, आता यश आणि नेहाचं लग्न झाल्याचं समजून त्यांनी मृत्यूपत्र तयार करायचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आजोबांनी मृत्यूपत्र करण्याची घोषणा केल्यापासून सिम्मी प्रचंड उत्साही आहे. संपत्तीचा सगळ्यात मोठा वाटा कोणाला मिळणार हे जाणून घेण्यासाठी ती उत्सुक आहे. त्यामुळे आता सिम्मीला संपत्तीचा वाटा मिळणार का? यशला किती संपत्ती मिळणार? यश- नेहाचं सत्य समजल्यावर आजोबा त्यांना संपत्ती देतील का? असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

Web Title: mazi tuzi reshimgath aajoba decided to make a will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app