संजू- रणजीतच्या नात्याला जाणार तडा?; साक्षीसोबतचा 'तो' फोटो येणार संजीवनी समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:52 PM2022-01-21T19:52:33+5:302022-01-21T19:54:17+5:30

raja rani chi g jodi: रणजीत आणि साक्षीचं नातं संजीवनीसमोर येणार आहे.

marathi tv serial raja rani chi g jodi new twist | संजू- रणजीतच्या नात्याला जाणार तडा?; साक्षीसोबतचा 'तो' फोटो येणार संजीवनी समोर

संजू- रणजीतच्या नात्याला जाणार तडा?; साक्षीसोबतचा 'तो' फोटो येणार संजीवनी समोर

Next

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत आता कुठे ढालेपाटील कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण व्हायला लागलं होतं. आईसाहेब आणि संजीवनी यांच्यातील मतभेद दूर होऊन त्या दोघी पुन्हा माय-लेकीप्रमाणे राहू लागल्या होत्या. तसंच आतापर्यंत घरावर आलेली सगळी संकटंदेखील दूर झाली आहे. परंतु, या आनंदाच्या वातावरणातच मीठाचा खडा पडणार आहे. रणजीत आणि साक्षीचं नातं संजीवनीसमोर येणार आहे.

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. यात रणजीत एका सिक्रेट मिशनवर काम करतोय. त्यामुळे हे मिशन सक्सेस होण्यासाठी तो साक्षीसोबत पुण्यात राहतोय. परंतु, पुण्यात तो साक्षीचा नवरा म्हणून राहत असल्याचं कोणालाही माहित नाही. मुळात हिच गोष्ट आता संजीवनी समोर येणार आहे. सुजय आणि मोनीचं लग्न ठरत असतांनाच रणजीत आणि साक्षी यांचा एक फोटो संजूच्या हाती लागणार आहे.

दरम्यान,  सुजय आणि मोनीच्या लग्नाला आईसाहेब परवानगी देतात. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याची तारीख आणि मुहूर्त ठरतो. म्हणूनच, आता साखरपुड्याच्या तयारीला लागा असं आईसाहेब संजूला सांगतात. त्याचवेळी तिच्या मोबाईलवर एक फोटो येतो. या फोटोमध्ये रणजीत साक्षीला मिठी मारतांना दिसत आहे. आता हा फोटो पाहिल्यानंतर संजू नेमकं काय करणार? रणजीत आणि तिच्या नात्यात पुन्हा दुरावा येणार का? की रणजीत तिला त्यांच्या सिक्रेट मिशनविषयी सांगणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या माध्यमातून मिळणार आहेत.

Web Title: marathi tv serial raja rani chi g jodi new twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app