अनघाने घेतली अरुंधतीची जागा; पुन्हा होणार देशमुखांच्या घराचं गोकुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 04:13 PM2022-01-17T16:13:09+5:302022-01-17T16:15:38+5:30

Aai kuthe kay karte: अनघा आणि अभिचं लग्न असल्यामुळे अरुंधती देशमुखांच्या घरात राहत होती. परंतु, हा लग्नसोहळा झाल्यावर ती तिच्या पुढील मार्गाकडे वळली आहे.

marathi tv serial aai kuthe kay karte anagha taken responsibility | अनघाने घेतली अरुंधतीची जागा; पुन्हा होणार देशमुखांच्या घराचं गोकुळ

अनघाने घेतली अरुंधतीची जागा; पुन्हा होणार देशमुखांच्या घराचं गोकुळ

Next

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत अलिकडेच अभिषेक आणि अनघा या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. विशेष म्हणजे हा लग्नसोहळा छोट्या पडद्यावर विशेष गाजला. अगदी संगीत, मेहंदीपासून ते अनघाच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक लग्नविधी उत्तमरित्या या मालिकेत दाखवण्यात आले. त्यामुळे ही मालिका रंजक वळणावर असल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता मालिकेत एक नवं वळण येणार आहे. अभि आणि अनघाच्या लग्नानंतर अरुंधती तिच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहे.

अनघा आणि अभिचं लग्न असल्यामुळे अरुंधती देशमुखांच्या घरात राहत होती. परंतु, हा लग्नसोहळा झाल्यावर ती तिच्या पुढील मार्गाकडे वळणार होती. त्यामुळे अरुंधती आता तिच्या घराचा कारभार अनघाच्या हातात सोपवून पुढे वळाली आहे. यामध्येच सध्या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनघा आणि गौरी अरुंधतीचं स्वयंपाक घर सांभाळतांना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विमल, आप्पा बाहेरचे पदार्थ का खाल्लेत असा जाब विचारते. इतकंच नाही तर वहिनींची (अरुंधती) घराकडे पाठ फिरल्यावर लगेच तुम्ही बाहेरचं खायला लागलात असंही म्हणते, त्यावर देशमुखांच्या घरावर अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे या घरात येणारा कोणताही माणूस उपाशी पोटी जाणार नाही असं सांगतात. आणि, विमलला घरातील स्वयंपाक घरात पाहायला सांगतात. यावेळी स्वयंपाक घरात गौरी आणि अनघा सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असतात. 

दरम्यान, अनिरुद्धसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरुंधती स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी राहिली आहे. नुकताच तिने आशुतोषचा एक मोठा म्युझिक अल्बम साईन केला आहे. त्यामुळे आता अरुंधती तिचं करिअर घडवतांना दिसत आहे. घटस्फोटानंतरही अरुंधती अनेक कारणांसाठी देशमुखांच्या घरात राहत होती. परंतु, आता ती या घरातून बाहेर पडणार असून नव्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. 

Web Title: marathi tv serial aai kuthe kay karte anagha taken responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app