सध्या इंस्टाग्रामवर मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचे त्यांच्या लाईफ पार्टनरसोबतचे त्यांच्या लग्नातील सुखद क्षणांचे फोटो पहायला मिळत आहेत. अचानक सगळे आपल्या लग्नातील फोटो का शेअर करत आहेत. असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. खरंतर झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेत सध्या लगीनसराई सुरू झाली आहे आणि या मालिकेतील कलाकारांनीच सर्वांना एक चॅलेंज दिलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेत समर व सुमीचं लवकरच लग्न पार पडणार आहे. त्या दोघांनी नुकतंच प्री वेडिंगदेखील केलं आहे. 


आता त्यांचं लग्न २२ सप्टेंबर संध्याकाळी ७ पार पडणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने समर व सुमीने सर्वांना त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे चॅलेंज दिलं आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनी सुमी व समरचं हे चॅलेंज स्वीकारलं आहे. 

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकर यानेदेखील त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा खांडकेकर हिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने म्हटले की, मंडळी तुमच्या लाडक्या कलाकारांनी समर-सुमीच्या लग्नानिमित्त सुरु झालेलं हे अनोखं चॅलेंज स्वीकारलंय. 

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील राधिका म्हणजे अनीता दाते हिनेदेखील तिच्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकर यानेदेखील त्याच्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

तसेच रात्रीस खेळ चाले मालिकेतील दत्ता म्हणजेच सुहास शिरसाठनेदेखील त्याच्या वेडिंग डायरीतील फोटो शेअर केला आहे.


संभाजी मालिकेतील अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिनेदेखील तिच्या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केला आहे.

अतुल परचुरेने देखील वेडिंग डायरीतील फोटो शेअर केला आहे.

पुष्कर श्रोत्रीने देखील त्याच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Web Title: Marathi celebrity accepted challenge of Mrs.Mukhyamantri , shared photo of wedding diaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.