Video: किशोरी शहाणेंना पडला वयाचा विसर; 53 व्या वर्षात केला 'छलका-छलका रे' वर भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:30 PM2021-10-18T18:30:00+5:302021-10-18T18:30:00+5:30

Kishori shahane: ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये किशोरी शहाणे झळकल्या आहेत.

marathi actress kishori shahane Chhalka Chhalka Re dance video viral | Video: किशोरी शहाणेंना पडला वयाचा विसर; 53 व्या वर्षात केला 'छलका-छलका रे' वर भन्नाट डान्स

Video: किशोरी शहाणेंना पडला वयाचा विसर; 53 व्या वर्षात केला 'छलका-छलका रे' वर भन्नाट डान्स

Next
ठळक मुद्देकेवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपट, मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत.

किशोरी शहाणे हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये किशोरी शहाणे झळकल्या आहेत. उत्तम अभिनय कौशल्य आणि कामाप्रतीचं प्रेम यामुळे आजही किशोरी शहाणे कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपट, मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत. विशेष म्हणजे वयाची ५० पार केल्यानंतरही त्यांच्यातील उत्साह कायम आहे. याचा प्रत्यय नुकताच चाहत्यांना आला आहे.

कलाविश्वाप्रमाणेच किशोरी सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा त्या त्यांच्या चित्रपट, मालिका किंवा अगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देत असतात. यात बऱ्याच वेळा त्या सेटवरील मज्जा-मस्ती करतांनाचे काही फोटो, व्हिडीओदेखील शेअर करतात.यामध्येच त्यांनी त्यांचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. 

किशोरी शहाणेचा नवरा आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; 'या' चित्रपटामुळे सुरु झाली Lovestory

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डान्स व्हिडीओमध्ये किशोरी शहाणे यांच्यासोबत अभिनेत्री स्नेहा भावसार झळकली. या दोघीही 'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवर डान्स करत असून त्यांनी 'साथिया' या चित्रपटातील 'छलका..छलका रे कलसी का पानी' या गाण्यावर ताल धरला आहे.

दरम्यान, किशोरी शहाणे यांचा हा डान्स पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्यांचा डान्स एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा आहे. त्यांनी धरलेला ठेका आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स यामुळे त्यांचा व्हिडीओ विशेष चर्चिला जात आहे. 
 

Web Title: marathi actress kishori shahane Chhalka Chhalka Re dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app