अखेर रायाने बांधली कृष्णासोबत लगीनगाठ; कृष्णा सापडणार मृत्यूच्या दारात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 01:44 PM2021-10-21T13:44:47+5:302021-10-21T13:45:25+5:30

Man jhal bajinda: राया आणि कृष्णाचं एकमेकांवर प्रेम नसतानाही गुली मावशी या दोघांना लग्न करण्यास भरीस पाडते.

man jhal bajinda serial update raya and krushna marriage | अखेर रायाने बांधली कृष्णासोबत लगीनगाठ; कृष्णा सापडणार मृत्यूच्या दारात?

अखेर रायाने बांधली कृष्णासोबत लगीनगाठ; कृष्णा सापडणार मृत्यूच्या दारात?

Next
ठळक मुद्देगुरुजींना सांगितलेलं भाकितदेखील खरं ठरणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद' (Mann zaal Bajind). या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलसं करुन घेतलं आहे. त्यामुळे सध्या ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरातने (shweta kharat) कृष्णा ही भूमिका साकारली आहे. वैभव चव्हाण(vibhav chavan) रायाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर पोहोचली असून राया आणि कृष्णाचं लग्न होणार आहे. इतकंच नाही तर कृष्णाच्या जीवाला धोका असल्याची भविष्यवाणीदेखील खरी ठरताना दिसणार आहे.

राया आणि कृष्णाचं एकमेकांवर प्रेम नसतानाही गुली मावशी या दोघांना लग्न करण्यास भरीस पाडते. त्यामुळे राया आणि कृष्णाचं लग्न होणार आहे. इतकंच नाही तर गुरुजींना सांगितलेलं भाकितदेखील खरं ठरणार आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये लग्नाची वरात परत जात असताना कृष्णा ज्या गाडीत बसली असते ती गाडी दरीत कोसळणार आहे. 

दरम्यान, कृष्णाची बस दरीत कोसळल्यानंतर पुढे काय होतं? खरंच रायाच्या बायकोचा मृत्यू होणार का?असे असंख्य प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. मात्र, या लग्नानंतर कृष्णाला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय या मागचं कोडं येत्या भागातच प्रेक्षकांना उलगडणार आहे. 

Web Title: man jhal bajinda serial update raya and krushna marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app