मकरसंक्रांत स्पेशल: लतिकाने केलं खास व्हिडीओ शूट; निखळ हास्यामुळे नेटकरी घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 18:45 IST2022-01-16T18:45:00+5:302022-01-16T18:45:00+5:30
Akshaya naik: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अक्षयाने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाचा काठपदराची बॉर्डर असलेला वनपीस गाऊन परिधान केला आहे.

मकरसंक्रांत स्पेशल: लतिकाने केलं खास व्हिडीओ शूट; निखळ हास्यामुळे नेटकरी घायाळ
नवं वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. यात खासकरुन काही अभिनेत्रींनी काळ्या रंगाच्या साडी नेसून फोटोशूट केलं. तर, काही अभिनेत्रींनी खास हलव्याचे दागिनी परिधान करुन त्यांची पहिली मकरसंक्रांत साजरी केली. या सगळ्या सेलिब्रिटींच्या गर्दीत मात्र, लतिकाने म्हणजेच सुंदरा मनामध्ये भरली फेम अभिनेत्री अक्षया नाईकने (akshaya naik) एक व्हिडीओ शूट करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अक्षयाने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाचा काठपदराची बॉर्डर असलेला वनपीस गाऊन परिधान केला आहे. तसंच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला karthika vaidyanathan याचं गाणं प्ले होतांना ऐकू येत आहे.
अक्षयाने हा व्हिडीओ नाशिकमधील साधना: चुलीवरची मिसळ या रेस्टॉरंटमध्ये काढल्याचं दिसून येत आहे. सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचं चित्रीकरणदेखील नाशिकमध्येच सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वीदेखील अक्षयाने नाशिकमधील एका मिसळ हाऊसमधील व्हिडीओ शेअर केला होता.
दरम्यान, या व्हिडीओमधील अक्षयाच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य आणि सालसपणा अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अक्षया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून अनेकदा ती तिचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या माध्यमातून अक्षया घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे अल्पावधीत लोकप्रिय झालेली अक्षय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं दिसून येतं.