ठळक मुद्दे‘नच बलिये 7’मध्ये हे कपल एकत्र दिसले. या शोमध्ये दोघांनीही नात्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला.

सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यातील ‘बिग बॉस 13’च्या घरातील वाद अद्यापही थांबायची चिन्हे नाहीत. साहजिकच या भांडणामुळे सिद्धार्थ व रश्मी सतत चर्चेत असतात. ‘बिग बॉस 13’च्या घरात गेल्यापासून रश्मी देसाईच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.  अरहान खानच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर तर रश्मी आणखीच फेमस झालीय. साहजिकच रश्मी ‘बिग बॉस 13’च्या अंतिम फेरीची दावेदार मानली जात आहे.

रश्मी देसाई हे टीव्ही जगातील एक मोठे नाव आहे. पण तिच्या अ‍ॅक्टिंग लाईफपेक्षा ती कायम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार आले आहेत. लग्न, गर्भपात  आणि नंतर घटस्फोट असे सगळे काही तिला सहन करावे लागले. रश्मीचे आयुष्य कदाचित खुल्या पुस्तकासारखे दिसेल. परंतु तिच्या या रिअल लाईफ स्टोरीत बरीच रहस्ये दडलेली आहेत.

होय, करिअर पिकवर असताना रश्मीने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्नगाठ बांधली. ‘उतरण’ या मालिकेच्या सेटवर रश्मी व नंदीश जवळ आलेत आणि दोघांत प्रेम फुलले. पुढे दोघांचे लग्न झाले. पण वर्षभरातच या रश्मी व नंदिशच्या कुरबुरीच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

 2012 मध्ये रश्मी-नंदीशचे लग्न झाले. केवळ 1 वषार्नंतरच त्यांच्या विवाहित आयुष्यातील कुरबुरीच्या बातम्या येऊ लागल्या. आधी दोघांनीही या बातम्या नाकारल्या. पण पुढे एकत्र राहणे कठीण झाले आणि लग्नाच्या चार वर्षांनंतर रश्मी व नंदीश विभक्त झालेत. 

अर्थात त्यानंतरही ‘नच बलिये 7’मध्ये हे कपल एकत्र दिसले. या शोमध्ये दोघांनीही नात्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला.  याच रियॅलिटी शोमध्ये रश्मीने गर्भपाताचा खुलासा केला होता. ‘नच बलिये 7’च्या निमित्ताने का होईना रश्मी व नंदीश यांच्यातील नाते पूर्ववत होत असल्याचे वाटू लागले असतानाच, या नात्यात आणखी एक वळण आले. होय, ‘नच बलिये 7’ संपल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे रश्मी व नंदीश यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आले. हे वाद इतके विकोपाला पोहोचलेत की, अखेर नंदीश आणि रश्मी यांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Love marriage, abortion and divorce ... why broken Rashmi Desai and Nandish Sandhu's relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.