लॉकडाऊनमध्ये कुशल बद्रिके पोलिसांना ठोकला कडक सॅल्युट, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:38 PM2020-04-13T14:38:14+5:302020-04-13T15:00:47+5:30

काही दिवसांपूर्वी कुशालचे कुटुंबासोबतचे 'गो करोनिया' गाणं व्हायरल झाले होते.

kushal badrike gave big salute to a police gad | लॉकडाऊनमध्ये कुशल बद्रिके पोलिसांना ठोकला कडक सॅल्युट, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

लॉकडाऊनमध्ये कुशल बद्रिके पोलिसांना ठोकला कडक सॅल्युट, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

googlenewsNext

लोकडाऊन सुरु झाल्यापासून सर्व कलाकार देखील घरी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ मधील लोकप्रिय विनोदवीर कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. त्याने त्याच्या कुटुंबाबरोबर सादर केलेले ‘गो करोनिया’ हे गाणे सध्या व्हायरल झालं.

या गाण्याबरोबरच आणखी एक भारुडही कुशलने, पत्नी आणि मुलांबरोबर सादर केलं.  लोकांच्या मनोरंजनासोबतच सध्याच्या परिस्थितीत लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, सरकार-प्रशासनातर्फे सुरू असलेले प्रयत्न आणि त्याला नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी कशाप्रकारे साथ दिली पाहिजे, यावर प्रबोधन करण्याचा कुशलचा उद्देश प्रामुख्याने दिसून येतो.

नुकतंच कुशलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केला असून त्याच्या हातामध्ये एका कार्डबोर्डवर थँक यु लिहिलेलं आहे. कुशल सोशल मीडीयाच्या माध्यमाने पोलिसांचे मनापासून आभार मानतोय. कठीण परिस्थितीत स्वतःचा विचार न करता पोलीस बांधव अहोरात्र काम करून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी कुशलने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत कुशालने, One salute to our real hero’s "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" असे कॅप्शन दिले आहे.  या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. 

 

Web Title: kushal badrike gave big salute to a police gad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.