KBC: बालपणी अमिताभ यांची फेवरेट होती 'ही' कार, रोज समोरच्या घरात बघायचे आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:52 PM2020-12-17T12:52:35+5:302020-12-17T13:01:22+5:30

बोलताना अमिताभ बच्चनने यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा शोमध्ये सांगितला. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, बालपणी मस्टॅंग त्यांचीही आवडीची कार होती.

KBC : Amitabh Bachchan reveals about his favorite car in Childhood while talking to contestant | KBC: बालपणी अमिताभ यांची फेवरेट होती 'ही' कार, रोज समोरच्या घरात बघायचे आणि....

KBC: बालपणी अमिताभ यांची फेवरेट होती 'ही' कार, रोज समोरच्या घरात बघायचे आणि....

googlenewsNext

कौन बनेगा करोडपतीच्या बुधवारच्या एपिसोडची सुरूवात मंगळवारचा रोल ओवर स्पर्धक अनामाया योगेश दिवाकरसोबत. अमिताभ बच्चनसमोर हॉटसीटवर बसलेल्या उडुपी कर्नाटकहून आलेल्या अनामयांना कार्सची चांगलीच माहिती होती. खेळ खेळत असताना अनामयाने सांगितले की, त्याच्या रूममध्ये मस्टॅंग कारचं एक पोस्टर लावलेलं आहे. अनामयाने सांगितलं की, मस्टॅंग त्याची आवडती कार आहे.

बोलताना अमिताभ बच्चनने यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा शोमध्ये सांगितला. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, बालपणी मस्टॅंग त्यांचीही आवडीची कार होती. बिग बी म्हणाले की, जेव्हा ते दिल्लीत राहत होते तेव्हा त्यांच्या घरासमोर प्रेसिडेंटचा बॉडीगार्ड राहत होता. ज्यांच्याकडे मस्टॅंग कार होती. अमिताभ यांनी सांगितले की, त्यावेळी समोरच्या घरातील कार पाहून त्या लोकांबाबत ईर्ष्या वाटत होती. ते विचार करत होते की, कधी सधी मिळाली तर ही कार ते नक्की विकत घेतील.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

अमिताभ यांना सांगितले की, त्यांनी ही गाडी कधी खरेदी केली नाही पण त्यांच्या एका मित्राकडे ही कार होती. त्यामुळे त्यांना जेव्हा संधी मिळत होती तेव्हा ते ती कार चालवत नक्की होते. दरम्यान बुधवारी हॉटसीटवर बसलेला अनामयाला कारची फार आवड होती आणि तो म्हणाला की, या खेळातून तो जी रक्कम जिंकेल त्यातून तो एक कारची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उघडेल. 

दरम्यान, कौन बनेगा करोडपतीमध्ये हा आठवडा वेदांतु किड्स स्पेशल वीक आहे. या आठवड्यात केवळ लहान मुलेच या शोमध्ये येतील आणि आस्क द एक्सपर्ट सुद्धा लहान मुलेच असतील. त्यासोबतच या आठवड्यात जे खेळाडू येतील ते पैसे नाही तर पॉइंट्स जिंकतील. जेवढे पॉइंट्स जिंकतील तेवढी रक्कम त्यांच्या नावाने एफडीत टाकली जाईल. १८ वर्षाचे झाल्यावर ते ही रक्कम काढू शकतील.
 

Web Title: KBC : Amitabh Bachchan reveals about his favorite car in Childhood while talking to contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.