'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालला 'या' गंभीर आजाराने ग्रासलं, म्हणाली - कधी स्टेजच्या मागे तर कधी रस्त्त्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:20 PM2021-12-06T17:20:54+5:302021-12-06T17:26:28+5:30

2002 मध्ये आलेल्या कांटा लगा या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली.

Kanta laga girl shefali jariwala is battling with this serious disease | 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालला 'या' गंभीर आजाराने ग्रासलं, म्हणाली - कधी स्टेजच्या मागे तर कधी रस्त्त्यात...

'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालला 'या' गंभीर आजाराने ग्रासलं, म्हणाली - कधी स्टेजच्या मागे तर कधी रस्त्त्यात...

googlenewsNext

2002 मध्ये कांटा लगा या गाण्याने शेफाली जरीवाला (Shefali Jariwala)  हे नाव घराघरात पोहोचले होते. या गाण्यामुळे शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती.शेफालीने अनेक म्युझिक व्हिडिओ केले असले तरी लोक तिला 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखतात. 2002 मध्ये रिलीज झालेल्या या म्युझिक व्हिडिओने शेफाली जरीवालाचे नशीब बदलले. मात्र यानंतर शेफाली जरीवाला काही वर्षे गायब झाली.

 ETimes ला दिलेल्या मुलाखतीत,  शेफाली जरीवालाने सांगितले की ती इंडस्ट्रीपासून का दूर गेली आणि तिने आणखी प्रोजेक्ट्समध्ये काम का केले नाही. शेफालीने असेही सांगितले की तिला फिट यायची. 

15 वर्षांची असताना आली होती फिट 
शेफाली जरीवाला म्हणाली, मला 15 वर्षांची असताना पहिल्यांदा फिट आली. मला आठवते की, त्यावेळी माझ्यावर अभ्यासात चांगले करण्याचे दडपण होते. तणाव आणि चिंता यामुळे फिट येऊ शकते. डिप्रेशनमुळे सुद्धा फिट येऊ शकते. मला वर्गात फिट यायची. कधी स्टेजच्या मागे तर कधी रस्त्याने चालताना मला फिट यायची. यामुळे कुठे ना कुठे तरी माझ्या आत्मसमानाला ठेच लागली.  

9 वर्षे नाही आली फिट 
शेफालीने मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिला 9 वर्षांपासून फिट आलेली नाही. त्याला आनंद आहे की तिने नैराश्य, चिंता आणि पॅनिक अॅटॅकवर मात केली आहे. ज्यासाठी ती मेडिटेशन योगा करते आणि व्यायाम करते.

Web Title: Kanta laga girl shefali jariwala is battling with this serious disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.