बिग बॉस सीझन 7 मध्ये झळकलेली अभिनेत्री काम्या पंजाबीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. काम्या लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ही गोष्ट खुद्द तिनेच सांगितली आहे. काम्याने बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

काम्याचा बॉयफ्रेंड शलभ डांग दिल्लीत राहणारा असून तो हेल्थकेअर बिझनेसमन आहे. काम्याची हे दुसरं लग्न आहे. काम्याने पहिल्या पतीला लग्नाच्या 10 वर्षानंतर 2013 साली घटस्फोट दिला होता.


काम्या आणि शलभ पुढील वर्षाच्या सुरूवातीला लग्न करू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, काम्या व शलभ एकमेकांना यावर्षी फेब्रुवारीत भेटले होते. काम्या पंजाबीने ती व शलभसोबत लव्ह स्टोरीबद्दल बॉम्बे टाईम्ससोबत मुलाखतीदरम्यान बऱ्याच गोष्टी सांगितल्या.


काम्या पंजाबीने सांगितले की, मी पुढील वर्ष लग्न करणार आहे. माझं शलभसोबत फेब्रुवारीपासून बोलायला सुरूवात झाली. माझ्या जवळच्या फ्रेंडने स्वास्थ्यासंदर्भातील गोष्टीबद्दल शलभकडून सल्ला घ्यायला सांगितल्या होत्या. त्यानंतर सातत्यानं माझी त्याच्यासोबत बोलणं होऊ लागलं. शलभने काही कालावधीनंतर प्रपोझ केलं. मी विचार करण्यासाठी वेळ मागितला. घटस्फोट झाल्यानंतर मी कोणत्याही नात्यात अडकण्यासाठी तयार नव्हते. वास्तविकतेत माझ्या जीवनात अशी वेळ आली होती जेव्हा मी लग्नाच्या विरोधात होते.


काम्याने पुढे सांगितलं की, शलभने पुन्हा एकदा मला लग्नाच्याबाबतीत विश्वास दिला. यावेळी मी 16 वर्षांच्या मुलीसारखी आहे जी त्याच्या प्रेमात वेडी आहे.


काम्याने गणेश चतुर्थीदरम्यान शलभसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


काम्याच्या पहिल्या नवऱ्याचं नाव बंटी नेगी होते. काम्या व बंटीची एक मुलगी आहे जिचं नाव आरा आहे. लग्नाच्या 10 वर्षानंतर काम्याने बंटीपासून विभक्त झाली. घटस्फोटानंतर आराचं संगोपन काम्याचं करत आहे.

काम्याच्या बॉयफ्रेंडचाही 10 वर्षांचा मुलगा आहे.


Web Title: Kamya Punjabi Tie The Knot Next Year With Delhi Boyfriend Shalabh Dang
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.