ठळक मुद्देकाम्याच्या लग्नातील लेहेंग्यावर सदा सौभाग्यवती भवः आणि काम्या वेड्स शलभ असे लिहिलेले होते. दीपिकाने देखील तिच्या लग्नात लेहेंगावर घेतलेल्या ओढणीवर सदा सौभाग्यवती भवः असे लिहिले होते.

सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरू आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी बॉयफ्रेंड शलभ दांगसह लग्नबंधनात अडकली. सात फेरे घेत तिने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये काम्या पंजाबीचं सौंदर्यं आणखीनच खुलून दिसत होते. तर दुसरीकडे शलभने देखील क्रीम आणि गोल्डन शेरवानी परिधान केली होती.

काम्याने तिच्या लग्नाचे काही फोटो आता तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण या फोटोंमुळे आता तिने लग्नात दीपिका पादुकोणला कॉपी केले अशी चर्चा रंगली आहे. काम्याच्या लग्नातील लेहेंग्यावर सदा सौभाग्यवती भवः आणि काम्या वेड्स शलभ असे लिहिलेले होते. दीपिकाला पाहूनच काम्याने हे केले अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण दीपिकाने तिच्या लग्नात लेहेंगावर घेतलेल्या ओढणीवर सदा सौभाग्यवती भवः असे लिहिले होते. 

लग्नाआधी काम्याने तिच्या प्रिवेडिंग सेलिब्रेशनचे काही फोटो चाहत्यांसह शेअर केले होते. या फोटोत ती धम्माल मस्ती करताना दिसली होती. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळाले होते. 

काम्या आणि शलभ एका वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. शलभ दिल्लीचा राहणारा असून तो हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. काम्या सोशल मीडियावर देखील शलभसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. फोटोंमध्ये दोघांचीही उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळते.

काम्या पंजाबीचे हे दुसरे लग्न आहे. 2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. तिला नऊ वर्षांची मुलगी असून ती तिच्यासोबतच राहाते. शलभचेही हे दुसरे लग्न असून त्याला पहिल्या पत्नीपासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे.

Web Title: kamya punjabi copy deepika padukone in her wedding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.