Kagar special episode on 'ekdum kadak' | 'एकदम कडक'च्या मंचावर रंगणार “कागर” विशेष भाग !
'एकदम कडक'च्या मंचावर रंगणार “कागर” विशेष भाग !

ठळक मुद्देरिंकू आणि शुभंकर यांनी कागर सिनेमातील गाण्यावर डान्स केला कागर विशेष भागाचे सूत्रसंचालन आदर्श शिंदे यांनी केले आहे

कलर्स मराठीवरील एकदम कडक या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील भाग विशेष असणार आहे. कारण कार्यक्रमाच्या मंचावर गप्पा रंगणार आहेत प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकरांसोबत.  संपूर्ण महाराष्ट्राची मनं ज्या दोन कलाकरांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटामध्ये जिंकली असे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एकदम कडकच्या मंचावर येणार आहेत. तसेच वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा नवा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम देखील (म्हणजेच चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलते, विकास हांडे, शशांक शेंडे, रिंकू राजगुरू, चित्रपटाचा नायक शुभंकर तावडे) या कार्यक्रमामध्ये आली होती. या दरम्यान या सगळ्यांनीच बऱ्याच गंमतीजमती, किस्से, आठवणी सांगितल्या. कागर विशेष भागाचे सूत्रसंचालन आदर्श शिंदे यांनी केले आहे. तर एकदम कडक या कार्यक्रमाच्या विशेष भागाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केले आहे. या भागामध्ये नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेख यांनी बरीच धम्माल मस्ती केली आहे आणि कागर चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. “एकदम कडक” कार्यक्रमाचे येत्या आठवड्याचे भाग सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर. 

 
कार्यक्रमामध्ये नागराज मंजुळे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली तसेच वाचनाची आवड कशी लागली याबद्दल देखील सांगितले. आकाश ठोसर याला त्याची आवडती सहकलाकार कोण विचारण्यात आले - राधिका आपटे कि रिंकू राजगुरू... यावर त्याने रिंकूचे नाव घेतले. आवडता दिग्दर्शक अनुराग कश्यप कि नागराज मंजुळे यावर त्याने नागराज मंजुळे असे उत्तर दिले. रिंकूला आवडता अभिनेता कोण असे विचारण्यात आले स्वप्नील जोशी कि अंकुश चौधरी तिने अंकुश चौधरी सांगितले तर आयुष्यात कोणासोबत एक दिवस डेट वर जायला आवडेल रीतेश देशमुख कि विकी कौशल रिंकूने लगेच उत्तर दिले विकी कौशल. याचबरोबर नागराज मंजुळे यांना देखील काही प्रश्न विचारण्यात आले त्यांचा आवडता दिग्दर्शक कोण महेश मांजरेकर कि सचिन पिळगावकर ? आवडता अभिनेता कोण आकाश ठोसर कि सोमनाथ अवघडे ? याची उत्तरं त्यांनी काय दिली हे जाणून घेण्यसाठी तुम्ही हा विशेष भाग नक्की बघा.

 एकदम कडक कार्यक्रमामध्ये रिंकू आणि शुभंकर यांनी कागर या चित्रपटातील लागलीया गोडी तुझी या गाण्यावर सुंदर डान्स सादर केला आहे. कागर या चित्रपटातील संपूर्ण टीमने त्यांचा चित्रिकरणा दरम्यानचा अनुभव, किस्से, त्यांच्या भुमिकेबद्दल आणि कथेबद्दल सांगितले. रिंकूने सांगितले कागर सारखा सिनेमा येण्याची मी वाट बघत होते कारण यातली माझी भूमिका वेगळी आहे आणि चित्रपटाचा विषय देखील वेगळा आहे. याच बरोबर कागर चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी कागर चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितले.
 

Web Title: Kagar special episode on 'ekdum kadak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.