क्षणात भंगलं स्वप्न...! साखरपुड्याच्या काही दिवसांआधीच ईश्वरी देशपांडेनं घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:45 AM2021-09-22T11:45:48+5:302021-09-22T11:47:51+5:30

Iswari Deshpande : ईश्वरी देशपांडे पुण्यातील नवोदित अभिनेत्री... पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिची दुर्दैवी अखेर झाली...

ishwari deshpande and shubham degade death read reason | क्षणात भंगलं स्वप्न...! साखरपुड्याच्या काही दिवसांआधीच ईश्वरी देशपांडेनं घेतला जगाचा निरोप

क्षणात भंगलं स्वप्न...! साखरपुड्याच्या काही दिवसांआधीच ईश्वरी देशपांडेनं घेतला जगाचा निरोप

Next
ठळक मुद्दे शुभम देगडे आणि ईश्वरी हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.  म्हणजे पुढच्या महिन्यात ते दोघं साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जातं.  

मराठमोळी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे (Iswari Deshpande)आणि तिचा बॉयफ्रेन्ड शुभम देगडे यांचा 20 सप्टेंबरला अपघाती मृत्यू झाला. गोव्यातील बागा-कालंगुट खाडीत कार कोसळली आणि या अपघातात ईश्वरी व शुभम यांचा करूण अंत झाला. भविष्याची अनेक स्वप्नं रंगवणा-या जोडप्यावर काळानं अचानक झडप घातलेली पाहून सगळेच हळहळले. हे जोडपं पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार होतं. सुखी संसाराची अनेक स्वप्नं त्यांनी रंगवली होती.  

गोवा येथील बागा रस्त्यावरून जात असताना शुभमचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार खाडीत कोसळली.  कारचे दरवाजे लॉक होते. बाहेर पडणं शक्य नव्हतं. अशात नाका-तोंडात पाणी गेलं आणि गुदमरून दोघांचाही मृत्यू झाल्याचे आता तपासात स्पष्ट झालं आहे.
 पोलीस निरिक्षक सुनील गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.  अग्निशमन दलाच्या सहाय्याने या दोघांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले.  

ईश्वरी देशपांडे हिने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. मराठीसोबतच ती काही हिंदी मालिकांमध्येही झळकली होती. अलिकडेच तिने तिच्या हिंदी आणि मराठी अशा दोन मालिकांचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं.  सुनील चौथमल दिग्दर्शित ‘प्रेमाचे साइड इफेक्ट्स’ हा ईश्वरी देशपांडेचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील पूर्ण झाले होते. चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असतानाच तिचे अपघाती निधन झाले.  सुनील चौथमल दिग्दर्शित ‘प्रेमाचे साइड इफेक्ट्स’ या चित्रपटात ईश्वरी देशपांडेसोबत अभिनेते दीपक शिर्के, रवी काळे, किशोरी अंबिये आणि सुप्रिया पाठक हे प्रमुख कलाकार म्हणून दिसणार आहेत.
 शुभम देगडे आणि ईश्वरी हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.  म्हणजे पुढच्या महिन्यात ते दोघं साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जातं.  ईश्वरी ही पाषाण-सूस परिसरात वास्तव्याला होती. तर शुभम हा नांदेड सिटी परिसरातील रहिवासी होता.

Web Title: ishwari deshpande and shubham degade death read reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app