indian idol 11 neha kakkar falls on stage while shaking a leg with aditya narayan | Oops Momentची बळी ठरली नेहा कक्कर, स्टेजवर करत होती डान्स आणि मग...!!
Oops Momentची बळी ठरली नेहा कक्कर, स्टेजवर करत होती डान्स आणि मग...!!

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन आयडल’चे 11 वे सीझन सतत चर्चेत आहे.

टीव्ही लोकप्रिय सिंगींग रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडल’  प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. विशाल ददलानी, अनु मलिक आणि नेहा कक्कर या शोचे 11 व्या सीझन जज करत आहेत. अशात नेहाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. सोनी टीव्हीने अधिकृतपणे हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात नेहा स्टेजवर येते आणि डान्स करता करता अचानक खाली पडते.
शोचा होस्ट आदित्य नारायण याला नेहा डान्सचे चॅलेंज देते. यानंतर नेहा व आदित्य ‘दिलबर’ गाण्यावर एकमेकांसोबत डान्स करू लागतात. आदित्य नेहाच्या डान्स मुव्ह कॉपी करतो तर अन्य सगळे दोघांनाही चीअरअप करतात.  डान्स करताना आदित्य नेहाचा हात पकडतो. पण तिला सांभाळताना त्याची भंबेरी उडते आणि नेहा स्टेजवर पडते. यानंतर आदित्य तिची माफी मागतो.
काही दिवसांपूर्वी एका स्पर्धकाने नेहाला बळजबरीने किस केले होते. त्याचा व्हिडीओही असाच व्हायरल झाला होता. यावरून वादही निर्माण झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन आयडल’चे 11 वे सीझन सतत चर्चेत आहे. 

अनु मलिकमुळेही हे सीझन वादात सापडले आहे. मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा अनु मलिक शोमध्ये पुन्हा परतला आहे. यानंतर पुन्हा वाद उफाळल्यानंतर अनु मलिकची शोमधून पुन्हा हकालपट्टी होणार, अशी चर्चा आहे. अर्थात टाईम्स आॅफ इंडियाने ही चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: indian idol 11 neha kakkar falls on stage while shaking a leg with aditya narayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.