'हृदयी प्रीत जगते' मालिकेत नवा ट्विस्ट, भरकार्यक्रमात प्रभास देणार विणावरील आपल्या प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 07:00 IST2023-02-11T07:00:00+5:302023-02-11T07:00:06+5:30

'हृदयी प्रीत जागते' मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. कॉन्सर्टच्या दिवशी प्रभास करणार वीणाला प्रपोज.

Hrudayi Preet Jagate serial episodic | 'हृदयी प्रीत जगते' मालिकेत नवा ट्विस्ट, भरकार्यक्रमात प्रभास देणार विणावरील आपल्या प्रेमाची कबुली

'हृदयी प्रीत जगते' मालिकेत नवा ट्विस्ट, भरकार्यक्रमात प्रभास देणार विणावरील आपल्या प्रेमाची कबुली

'हृदयी प्रीत जागते' ही एक तरुण संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेचा नायक रॉक बँड परफॉर्मर आहे, तर नायिका कीर्तन गायिका आहे ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे.

आता पर्यंतच्या भागात आपण पाहिलं की, वीणाच्या बोलण्याने प्रभावित झालेले प्रायोजक प्रभासच्या बँडला एक संधी देतात. त्यामुळे उत्साहित सर्वजण कॉन्सर्टची जोरदार पद्धतीने तयारीला सुरुवात करतात. ही तयारी सुरु असताना बँडमधील सगळ्यांची पूर्ण खात्री होते की प्रभास वीणाच्या प्रेमात आहे. पण तरीही तो प्रपोज करायला तयार नाही. ह्याच गोष्टीमुळे उर्मीची चिडचिड होते आणि ती आत्महत्या करायचा असफल प्रयत्न करते.

 उर्मीची आई उर्मीला समजावते कि आधी खात्री कर की त्या दोघांचं खरच प्रेम आहे ? कॉन्सर्टच्या तयारी दरम्यान वीणालाही जाणवतं की हळूहळू तीदेखील प्रभासच्या प्रेमात आहे. शेवटी प्रभास ठरवतो  कॉन्सर्टच्या दिवशी आपण वीणाला प्रपोज करायचं. या सर्वात वीणा सुद्धा प्रभासला आपल्या प्रेमाची कबुली देईल? प्रभास आणि वीणामध्ये प्रेमाच फ्युजन होईल? हे आपल्याला लवकरच कळेल. 


 

Web Title: Hrudayi Preet Jagate serial episodic