परितोष त्रिपाठी, अभिनेता  


होळी हा माझा सर्वात आवडता उत्सव आहे कारण आपण आपले सर्व वाद विसरून एकत्रितपणे होळी साजरे करतो. यावर्षी मी दिल्ली मधून माझी आई, बहीण आणि तिच्या कुटूंबियांसमवेत साजरा करणार आहे जेणेकरून आपण अंदाज लावू शकता की ही होळी किती मनोरंजक असेल. होळी आणि दिल्लीबद्दल माझ्या बर्‍याच आठवणी आहेत, कारण मी माझे कॉलेज दिल्लीहून केले आहे. मी उत्तर प्रदेशचा आहे; मला माझे शाळेचे दिवस आठवतात. आम्ही वास्तविक उत्सवाच्या आठवड्यापूर्वी होळी साजरी करण्यास सुरवात करतो. माझी आई सणाचे गोड पदार्थ बनवते. होळीच्या संध्याकाळी, आपण सर्वजण एकत्र जमून पारंपारिक होळीचे गाणी गातो, ज्यास ‘फागुआ गीत’ असे संबोधले जाते. कोरड्या आणि पर्यावरणास अनुकूल होळी खेळण्यावर माझा विश्वास आहे. मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि मित्रांना विनंती करू इच्छित आहे की कृपया सुरक्षित आणि कोरडी होळी खेळा, आपण जितके शक्य असेल तितके पाणी वाचवा. 

स्मिता बंसल, अभिनेत्री


होळी हा रंगांचा व मौजमजेचा सण आहे. मला हा सण खूप आवडतो. लहानपणी आम्‍ही होळी सणाची आतुरतेने वाट पाहायचो. आम्‍ही आमच्‍या मित्रांच्‍या घरी जायचो, त्‍यांना भेटायचो आणि त्‍यांच्‍यासोबत रंग व पाणी उडवत सण साजरा करायचो. माझ्या बालपणी माझी आई सांगायची की होळी दहन पाहणे अत्‍यंत शुभ आहे. यामुळे आपले शरीर पवित्र बनते आणि त्‍याचे वैद्यकीय लाभ देखील आहेत. आज मला वाटते की, होळीच्‍या दिवशी पाणी खूप वाया जाते. आजच्‍या काळातील ही वाढती समस्‍या आहे. मी माझ्या मुलांना होळीच्‍या दिवशी पाणी वाया न घालवण्‍यास सांगते. पण मी त्‍यांना सणाची मौजमजा घेण्‍यापासून परावृत्त देखील करत नाही. म्‍हणून मुलांना एक बादलीभर पाणी दिले तरी चालेल. पण लोकांनी त्‍याचा अपव्‍यय करू नये आणि इतर दिवशी देखील पाण्‍याचा मर्यादित प्रमाणात वापर करावा. माझ्या मते कोणताही सण साजरा करण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे कुटुंबासोबत वेळ व्‍यतित करणे आणि हीच प्रत्‍येक खास सणाची खासियत आहे. मी वेळ काढून माझ्या मुलांना त्‍यांच्‍या आजी-आजोबांकडे घेऊन जाते. ज्‍यामुळे त्‍यांना दररोज न भेटणा-या कुटुंबासोबत वेळ व्‍यतित करायला मिळते.

गुल्‍की जोशी, अभिनेत्री


माझ्या मते होळी हा सर्व दुराव्‍यांना मोडून काढणारा सण आहे. तुम्‍ही एखाद्या व्‍यक्‍तीसोबत बोलत नसाल, पण एकमेकांना रंग लावताच तुम्‍ही नकळतपणे मित्र बनून जाता. सर्वजण आनंद व एकतेच्‍या रंगामध्‍ये रंगून जातात. मी नेहमीच होळी सण जल्‍लोषात साजरा करते. सकाळी उठताच मी प्रथम स्‍वत:लाच रंग लावते आणि नंतर माझ्या कुटुंबामधील सदस्‍यांना रंगवते. त्‍यानंतर मी माझ्या मित्रांच्‍या घरी जाऊन त्‍यांना होळीच्‍या शुभेच्‍छा देते. मी होळीच्‍या दिवशी माझ्या सर्व मित्रांना भेटते. माझ्या मते मित्र व कुटुंबासोबत सण साजरा करणे हा सणाचा आनंद घेण्‍याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यंदाच्‍या होळीला मी माझ्या सर्व चाहत्‍यांना आवाहन करू इच्छितो की, सुरक्षितपणे सण साजरा करा, घातक रंगांचा वापर करू नका आणि स्‍वच्‍छ पाण्‍याचा वापर करा. हा सण मौजमजा व आनंदाचा आहे, जो सर्वांना एकत्र आणतो. म्‍हणून या सणाचा अधिकाधिक आनंद घ्‍या.

देव जोशी, अभिनेता


माझ्या बालपणापासून होळी सणाबाबत काही चांगल्‍या आठवणी आहेत. माझ्या घरी मी रंगामध्‍ये हात बुडवून घराच्‍या भिंतींवर माझ्या हाताचे रंगबेरंगी ठसे उमटवायचो. मला पिचकारीने रंग उडवायला खूप आवडायचे. मी होळी सणापूर्वी विविध प्रकारच्‍या पिचकारी खरेदी करायचो. आमच्‍या सोसायटीमध्‍ये एक काका होते. ते माझ्याशी नेहमी रागाने बोलायचे. म्‍हणून मी होळी सणादरम्‍यान माझ्या पिचकारीने त्‍यांची गाडी रंगवायचो. मला अहमदाबादमध्‍ये टोमॅटोची होळी पाहण्‍याची संधी मिळाली. येथे टोमॅटोमध्‍ये होळी साजरी केली जाते. मी तेथे पाहुणा म्‍हणून गेलो होतो. म्‍हणून मी सर्वांसोबत होळी साजरी करू शकलो नाही. पण ते साजरीकरण माझ्या नेहमीच स्‍मरणात राहिल. होळी सण पुरणपोळीच्‍या गोड आठवणींना घेऊन येतो. यंदाच्‍या होळीला मी माझ्या सर्व चाहत्‍यांना आवाहन करू इच्छितो की, सुरक्षितपणे सण साजरा करा, घातक रंगांचा वापर करू नका आणि स्‍वच्‍छ पाण्‍याचा वापर करा. हा सण मौजमजा व आनंदाचा आहे, जो सर्वांना एकत्र आणतो. म्‍हणून या सणाचा अधिकाधिक आनंद घ्‍या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Holi 2020: television Celebrities Holi memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.