ठळक मुद्देसारा ही नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीत अडकली असल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये तिला अटक करण्यात आली अशी बातमी कधी ऐकायला मिळते तर कधी तिचा बाथटबमधील न्यूड व्हिडिओ लीक होतो.

सपना बाबुल का बिदाई या मालिकेद्वारे सारा खानने छोट्या पडद्यावर एंट्री केली. आज तिचा वाढदिवस असून तिचा जन्म भोपाळमधील आहे. साराने बिदाई या मालिकेत साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. यानंतर ती ससुराल सिमर का, राम मिलाये जोडी यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. बिग बॉस या कार्यक्रमातदेखील स्पर्धक म्हणून आपल्याला साराला पाहायला मिळाले होते. साराने बिग बॉसच्या घरात असताना अली मर्चंट या तिच्या प्रियकरासोबत लग्नदेखील केले होते. पण हे लग्न केवळ काही दिवसांसाठी टिकले. सारा ही भारतीय टेलिव्हिजनवरची एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच पाकिस्तानमध्येदेखील तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लेकिन, बे कुडी या तिच्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता.

सारा ही नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीत अडकली असल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये तिला अटक करण्यात आली अशी बातमी कधी ऐकायला मिळते तर कधी तिचा बाथटबमधील न्यूड व्हिडिओ लीक होतो. साराचा हा व्हिडिओ तिची बहिण आयराच्या चुकीमुळे लीक झाला असल्याचे म्हटले जात होते. सारा तिची बहीण आयरासोबत श्रीलंकेला फिरायला गेली होती. त्यावेळी दोघींनी बाथटबमध्ये मजा मस्ती करतानाचा व्हिडिओ काढला होता. 

पण हा व्हिडिओ आयराने चुकून इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आयराला तिची चूक कळताच तिने हा व्हिडिओ लगेचच डिलीट केला होता. पण त्याआधी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता. साराने केवळ चीप पब्लिसिटीसाठी हा व्हिडिओ लीक केला असे अनेकांनी तिला त्यावेळी सुनावले होते. 

एवढेच नव्हे तर अनेकवेळा ती तिचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते. या फोटोंमुळे देखील तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल व्हावे लागते. 

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये सारा चित्रीकरणासाठी गेली होती. त्यावेळी तिने व्हिजाच्या काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिला जेलमध्ये जावे लागले होते असा दावा एका वेवबाइटने दावा केला होता. योग्य व्हिजा नसताना भारतात येण्याचा ती प्रयत्न करत असताना तिला विमानतळावर अडवण्यात आले होते आणि त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती असे या वेबसाइटने म्हटले होते. पण या सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्याचे साराने सांगितले होते. साराने म्हटले होते की, मला विमानतळावर थांबवण्यात आले हे खरे आहे. माझा व्हिजा पाहण्यासाठी मला काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. पण मला कोणीही अटक केले नाही की मला जेलमध्ये जावे लागले नाही. त्यामुळे या अफवा कोण पसरवत आहेत हेच मला कळत नाही. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Former Bigg Boss contestant Sara Khan famous for her controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.