सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने विवाह समारंभांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येतेय. बॉलिवूडमध्ये अनेकांनी साखरपुडा आणि लग्न समारंभ उरकून घेतले आहेत. होय, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे छोटया पडद्यावरील ‘दीया और बाती हम’ या मालिकेतील नुकतेच झालेले प्राची तेहलान हिचे लग्न. तिने दिल्लीतल्या एका बिझनेसमॅनसोबत लग्न केल्याचे समजतेय. बघा त्यांच्या विवाहातील काही फोटो...

‘दीया और बाती हम’ या मालिकेत आरजू राठी हिची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची तेहलान हिने दिल्लीतील बिझनेसमॅन रोहित सरोहा याच्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकली आहे. प्राचीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांची लग्ने पुढे ढकलली गेली होती. आता मात्र या लग्नांना मुहूर्त मिळाल्याने अनेक जोडपे लग्नाच्या बंधनात अडकताना दिसत आहेत. प्राचीच्या लग्नात केवळ जवळचे ५० नातेवाईक उपस्थित होते. तिने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

प्राची डेस्टिनेशन वेडिंग करू इच्छित होती. मात्र, तिला कोरोनामुळे हा प्लॅन टाळावा लागला. लग्नाचे सर्व विधी दिल्लीत पूर्ण झाले. प्राचीचे हे लग्न लव्ह कम अ‍ॅरेंज असल्याचे समजते आहे. दोघांची भेट एका फॅमिली फंक्शनमध्ये झाली होती. प्राची तिच्या लग्नाबद्दल सांगते,‘सर्व काही व्यवस्थित पार पडले. समारंभात सोशल डिस्टंन्सिंगची काळजी घेतली गेली. त्यासोबतच आम्ही मास्क देखील लावले होते.’ प्राचीने ‘दीया और बाती हम’ या मालिकेत काम केले आहे. तसेच त्यानंतर तिने ‘इक्यावन’ या मालिकेत काम केले आहे. टीव्हीशिवाय तिने पंजाबी, मल्यालम, तेलुगू चित्रपटातही काम केले आहे. प्राचीने लग्नानंतरही काम क रणार अशी माहिती दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Diya Aur Bati Hum' serial Actress Married with Delhi Businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.