ठळक मुद्देदिवाळीच्या सुट्टी नंतर शूटिंग सुरू करण्याआधी या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला आणि डाएट वगैरे विसरून करंजी, चकली, शंकरपाळे, शेव आणि त्याचबरोबरीने लाडू यांच्यावर ताव मारला.

दिवाळीचा मोसम असल्याने सर्वत्र फराळाचे बेत आखण्यात येत आहेत. मग याला आपले लाडके कलाकार कसे अपवाद ठरतील. असाच फराळाचा जंगी बेत प्रेक्षकांची आवडती मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'च्या सेटवर करण्यात आला. दिवाळीच्या सुट्टी नंतर शूटिंग सुरू करण्याआधी या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला आणि डाएट वगैरे विसरून करंजी, चकली, शंकरपाळे, शेव आणि त्याचबरोबरीने लाडू यांच्यावर ताव मारला. फराळाच्या मेजवानीचा आस्वाद घेताना माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या संपूर्ण टीमचा हा सेल्फी खास त्यांच्या चाहत्यांसाठी. या फोटोत आपल्याला या मालिकेतील कलाकारांसोबतच या मालिकेचे तंत्रज्ञ देखील पाहायला मिळत आहेत.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला आज इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या मालिकेतील राधिका, गुरू, शनाया हे सगळेच प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहेत. ही मालिका आजही टिआरपी रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. 

अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या रिपोर्टमध्ये पूर्वी माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर होती. पण तुझ्यात जीव रंगला या मालिकेने आता या मालिकेला चांगलेच मागे टाकले आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Web Title: diwali celebration on the set of Mazya Navryachi Bayko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.