ठळक मुद्देमिथुन यांचे याद आ रहा है हे गाणे चांगलेच प्रसिद्ध आहे. हे शिल्पा शेट्टीचे प्रचंड आवडते गाणे आहे असून हे देखील गाणे एका टेकमध्ये चित्रीत झाले आहे. एवढेच नव्हे तर ए ओ आ देखील एका टेकमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय, दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात मिथुन चक्रवर्ती हजेरी लावणार आहेत. 

या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे सुपर डान्सरचे परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर यांच्यासह सर्व स्पर्धक ९० च्या युगाला साजेशी अशी वेशभुषा करणार आहेत. या कार्यक्रमात नऊ वर्षीय तेजस आणि त्याचे सुपर गुरू तुषार मिथुन यांच्या 'डिस्को डान्सर' या अतिशय लोकप्रिय गाण्यावर थिरकणार असून त्यांचा हा परफॉर्मन्स मिथुन यांना देखील आवडणार आहे. हा परफॉर्मन्स पाहून मिथुन यांनी या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेच्या काही आठवणींना उजाळा दिला. मिथुन यांनी या गाण्याविषयी सांगितले की, या गाण्यात एकूण ६४ बिट्सचा समावेश आहे. पण तरीही हे गाणे मी एका टेकमध्ये पूर्ण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक वीर सुभाष आणि या गाण्याचे गायक बप्पी दा यांचे माझ्या यशात प्रचंड योगदान आहे. 

मिथुन यांचे याद आ रहा है हे गाणे चांगलेच प्रसिद्ध आहे. हे शिल्पा शेट्टीचे प्रचंड आवडते गाणे आहे असून हे देखील गाणे एका टेकमध्ये चित्रीत झाले आहे. एवढेच नव्हे तर ए ओ आ देखील एका टेकमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचे फॅन फॉलोव्हिंग केवळ भारतातच नव्हे तर जगभर आहे. रशिया, फ्रान्स, इजिप्त, तुर्की, अल्जीरिया कोणत्याही देशात मिथुन गेल्यानंतर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम त्यांना मिळते. यावर शिल्पाने सांगितले की, "एकदा मी युक्रेनला गेले होते, तिथे मिथुनदांचा एक चाहाता मला भेटला होता. या चाहत्याने त्याला जिमी जिमी हे गाणे खूप आवडत असल्याचे मला सांगितले होते. 

Web Title: Disco king Mithun Da recorded 64 beats of ‘Disco Dancer’ in just one take – revealed on Super Dancer Chapter 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.