Did Kapil Sharma and Sunil Grover come face-to-face at Sohail Khan's house party last night? | जेव्हा सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा आले एकमेकांसमोर

जेव्हा सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा आले एकमेकांसमोर

ठळक मुद्देकपिल आणि सुनील सलमानच्याच घरातील एका पार्टीसाठी एकत्र आले होते. ते दोघे सोहेलच्या पार्टीला वेगवेगळ्या वेळेवर आले असल्याचे दिसून आले. या पार्टीत सलमानने त्यांच्यामधील भांडणं मिटवली का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा हे एकेकाळी एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. त्या दोघांनी कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. पण याच कार्यक्रमाच्या दौऱ्यासाठी कपिल, सुनील आणि या कार्यक्रमाची संपूर्ण टीम सिडनीला गेली होती. पण सिडनीवरून परतत असताना विमानात कपिल आणि सुनीलची चांगलीच भांडणं झाली होती. एवढेच नव्हे तर कपिलने सुनीलवर हात उगारला होता असेही म्हटले जाते. या घडलेल्या प्रकारानंतर सुनीलने कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा कार्यक्रम सोडला आणि त्यानंतर त्याने कपिल सोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच द कपिल शर्मा या कार्यक्रमात देखील आपल्याला सुनीलला पाहाता आले नाही.

द कपिल शर्मा शोचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचा निर्माता हा सलमान खान आहे. सलमान हा कपिल आणि सुनील या दोघांचाही चांगला मित्र असल्याने त्यांच्यात तो मध्यस्थी करणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली आहे. त्यामुळेच द कपिल शर्मा शोच्या या सिझनमध्ये सुनील झळकू शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण सुनीलची क्रिएटिव्ह पार्टनर प्रीती सिमॉनने या शक्यता नाकारल्या आहेत. सुनील हा सध्या भारत या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तसेच त्याचे काही प्रोजेक्टदेखील सुरू असल्याने तो दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमासाठी वेळ देऊ शकत नाही असे तिने म्हटले आहे. 

कपिल आणि सुनीलमधील भांडणे मिटवण्यासाठी सलमान प्रयत्न करणार आहे अशी चर्चा सुरू असतानाच आता सोहेल खानच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने त्या दोघांनी एकाच ठिकाणी नुकतीच हजेरी लावली. कपिल आणि सुनील सलमानच्याच घरातील एका पार्टीसाठी एकत्र आले होते. ते दोघे सोहेलच्या पार्टीला वेगवेगळ्या वेळेवर आले असल्याचे दिसून आले. या पार्टीत सलमानने त्यांच्यामधील भांडणं मिटवली का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did Kapil Sharma and Sunil Grover come face-to-face at Sohail Khan's house party last night?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.