हा खरंच वेडा आहे का? ‘देवमाणूस’चा बजा जोरात अन् नेटकरी कोमात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:25 PM2021-05-30T19:25:55+5:302021-05-30T19:26:32+5:30

Devmanus : बज्याला जो देवमाणूस वाटतोय त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार का ?

devmanus new promo out, social media users trolls bajya | हा खरंच वेडा आहे का? ‘देवमाणूस’चा बजा जोरात अन् नेटकरी कोमात!!

हा खरंच वेडा आहे का? ‘देवमाणूस’चा बजा जोरात अन् नेटकरी कोमात!!

Next
ठळक मुद्देडॉक्टर हाच देवीसिंग असल्याचं सर्वांसमोर यावं, यासाठी एसीपी दिव्या सिंग  डॉक्टरविरोधात पुरावे गोळा करतेय.

 ‘देवमाणूस’ (Devmanus) ही नवी मालिका झी मराठीवर आली आणि बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.  मालिकेसोबतच सरू आज्जी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत.  देवी सिंग  नावाचा एक गुन्हेगार डॉक्टर होऊन गावातील लोकांना कसा लुबाडतो, महिलांचे शारिरीक आणि आर्थिक शोषण करुन त्यांच्या कशा हत्या करतो? असे कथानक असलेली एका गुन्हेगारावर आधारित ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.   या लोकप्रिय मालिकेचा उत्तरार्ध आता सुरु झाला असून लवकर एसीपी दिव्या या डॉक्टरला बेड्या ठोकणार आहे.
अर्थात दिव्यासाठी हे सोपं  नाहीये. कारण विश्वास. हो, गावातील लोकांचा त्यावर प्रचंड विश्वास आहे. इतका की, पैलवान बजाने तर थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
होय, ‘देवमाणूस’चा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

‘आता बघतो मी दिव्या मॅडम डॉक्टरला कशा पकडतात ते? जो पर्यंत बजा जिवंत आहे तो पर्यंत डॉक्टरच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही, असे बजा म्हणताना दिसतोय.


 

मात्र हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी संतापले आहेत.  हा बजा खरंच वेडा आहे का?, बजाचं डोकं अल्ट्रा प्रोमॅक्स आहे का? बजाला जेलमध्ये टाका आणि डॉक्टरला तर पहिले टाका आणि फाशी द्या,  अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. 

डॉक्टर हाच देवीसिंग असल्याचं सर्वांसमोर यावं, यासाठी एसीपी दिव्या सिंग  डॉक्टरविरोधात पुरावे गोळा करतेय. मालिकेचा हा शेवट असून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी होती. परंतु हा मालिकेचा शेवट नसून मालिकेत प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Web Title: devmanus new promo out, social media users trolls bajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app