Deepika Singh to make come back on tv' | दीपिका सिंग 'या' मालिकेतून करतेय कमबॅक 
दीपिका सिंग 'या' मालिकेतून करतेय कमबॅक 

ठळक मुद्देदीपिकाचा मुलगा सोहम 2 आता दोन वर्षांचा झाला आहे. दीपिका आणि रोहित यांचे लग्न 2014 मध्ये धुमधडाक्यात झाले होते

दीपिका सिंग कलर्सच्या 'कवच 2' मधनू कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिका सिंग यात संध्या नावाची भूमिका साकारत आहे. दोन वर्षांनंतर दीपिका छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. दीपिकाचा मुलगा सोहम 2 आता दोन वर्षांचा झाला आहे.   

याबाबत बोलताना दीपिका म्हणाली, “या दोन वर्षात मला अनेक ऑफर मिळाल्या होत्या, पण माझा मुलगा लहान असल्याने मी त्याला वेळ द्यायचे ठरवले. मला वाटते की 'कवच 2' माझ्यासाठी बेस्ट आहे कारण अशी भूमिका मी याआधी केली नव्हती. माझ्या पतीने मला पाठिंबा दिला आणि त्यांनी माझ्या नव्या वेळापत्रकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एका महिन्याची सुट्टी घेतली होती. असा पाठिंबा देणारा पती आणि परिवार मिळाला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.”

दीपिका गेल्या दोन वर्षांपासून नेहमीच तिच्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात देखील होती. दीपिका आणि रोहित यांचे लग्न 2014 मध्ये धुमधडाक्यात झाले होते. रोहित हा तिच्या दिया और बाती हम या मालिकेचा दिग्दर्शक होता. या दोघांची या मालिकेच्या सेटवरच ओळख झाली होती आणि ते प्रेमात पडले होते. मालिकेच्या सेटवर रोहित हा प्रियकर नसून केवळ माझा दिग्दर्शक असायचा असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.  
 


Web Title: Deepika Singh to make come back on tv'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.