छोटया पडद्यावर आपल्या कॉमेडीने धुमाकूळ घालणारा कॉमेडियन म्हणजे कपिल शर्मा. त्याची कॉमेडीची टायमिंग आणि सेटवरील त्याचा वावर यामुळे त्याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्रोफेशनल लाईफसोबतच तो पर्सनल लाईफबद्दल पण खूप उत्सुक असतो. सहा महिन्यांपूर्वी त्याने त्याची बालमैत्रिण गिन्नी हिच्यासोबत लग्न केले. आता आमच्याकडे त्याच्याबद्दल एक खास बातमी आहे. ती वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच.

कपिल शर्माने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर  एक कोलाज फोटो पोस्ट केला आहे. यातील एका फोटोत तो स्माईल करताना दिसतो आहे. तर दुसºया फोटोत तो केवळ गॉगल घालून दिसतो आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे,‘ हास्य तुम्हाला जास्त जिवंत ठेवते. काय वाटतं तुम्हाला? (सहा महिन्यांनंतर क्लीन शेव्ह) लग्नाच्या सहा महिन्यांनंतर मी आता लूक बदलला आहे. या त्याच्या फोटोला नेटिझन्सच्या कमेंटस सुरू झाल्या. एका युजरने म्हटले,‘हा लग्नाचा परिणाम’ एकीने लिहिले की,‘जवान कप्पू शर्मा’ अशा या फोटोला विविध प्रतिक्रिया आल्या. 

थोडक्यात काय तर, कपिल शर्माचा हा नवा लूक चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करतो आहे. त्याच्यासोबतच नेटिझन्स ‘मशहूर गुलाटी’ याच्यासोबत बोलणं देखील विसरले नाहीत. चाहते यांचा जोडी पुन्हा टीव्हीवर एकत्र पाहू इच्छितात, असेच तर यातून समोर येत नाही ना?


Web Title: The 'Comedy' on the small screen changed after 6 months of marriage; Now look like this!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.