Billo Rani Aka Bipasha Basu crush on this person, know about this person | बिल्लो राणी उर्फ बिपाशा झाली या व्यक्तीवर फिदा, जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती
बिल्लो राणी उर्फ बिपाशा झाली या व्यक्तीवर फिदा, जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती


स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेच्या कथानकाला अनपेक्षित कलाटण्या आणि वळणे मिळत असल्याने या मालिकेने प्रेक्षकांना छोट्या पडद्याला खिळवून ठेवले आहे. आपल्या दणकट आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने असंख्य तरुणींना घायाळ करणारा टीव्हीवरील देखणा अभिनेता करण सिंग ग्रोव्हर हा आता या मालिकेतील ऋषभ बजाजची लोकप्रिय भूमिका साकारणार आहे. या बजाजच्या लूकने त्याची पत्नी बिपाशा बासूला देखील चांगली भुरळ पाडली आहे.

या भूमिकेतील त्याच्या रूपाबद्दल त्याची सार्वत्रिक प्रशंसा होत असून त्याची पत्नी व बॉलिवूडची अभिनेत्री बिपाशा बसू हिनेही त्याच्याबद्दलचे आपले प्रेम उघड केले आहे.

या नव्या भूमिकेसाठी बिपाशा बसूने सोशल मीडियावरून करणला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या या भूमिकेतील रूपाचीही प्रशंसा केली. मि. बजाजच्या वेशभूषेतील करण सिंगचे छायाचित्र प्रसृत करून तिने म्हटले, “‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेतील या प्रसिद्ध बजाजच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा! माझा पती हा देखणा आहे, हे मला ठाऊक होतंच, पण त्याच्या केसांमधील रुपेरी छटेतील त्याची छबी काही औरच दिसते. अगदी मोजक्याच लोकांना असा लूक शोभून दिसतो आणि करण हा त्यापैकी एक नक्कीच आहे. या नव्या भूमिकेचा आनंद घे, प्रिय करण!”

 
करण सिंग ग्रोव्हरला या नव्या ऋषभ बजाजच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षक अधीर झाले असून त्याचे हे नवे रूप त्यांना खूपच पसंत पडलेले दिसते.

बिपाशा व करण सिंग ग्रोव्हर आदत चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वी पार पडले आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 


Web Title: Billo Rani Aka Bipasha Basu crush on this person, know about this person
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.