Bigg Boss Marathi 3 : दादूसने प्रत्येकाला रडवलं...; भावुक झालं ‘बिग बॉस’चं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:17 PM2021-09-23T14:17:04+5:302021-09-23T14:18:09+5:30

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, आणि Bigg Boss Marathi 3 च्या घरात हे दोन्ही आहे...

bigg boss marathi season 3 updates dadus aka Santosh Chodhari made everyone cry | Bigg Boss Marathi 3 : दादूसने प्रत्येकाला रडवलं...; भावुक झालं ‘बिग बॉस’चं घर

Bigg Boss Marathi 3 : दादूसने प्रत्येकाला रडवलं...; भावुक झालं ‘बिग बॉस’चं घर

Next
ठळक मुद्देआगरी कोळी समाजातून बिग बॅासमध्ये झळकणारा दादूस हा पहिलाच कलाकार आहे.

बिग बॉस मराठी 3’ची (Bigg Boss Marathi 3 ) सुरूवात भांडणानं झाली. पण यानंतर घरातलं वातावरण असं काही भावूक झालं की, स्पर्धकांना रडू कोसळलं. होय, सर्वांच्या लाडक्या दादूसने अर्थात  संतोष चौधरीनं (Dadus aka Santosh Chodhari) असं काही केलं की, सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.
दादूसने असं काय केलं की घरातील वातावरण इतकं भावूक झालं? तेच आम्ही सांगणार आहोत.
कालच्या एपिसोडमध्ये दादूस आणि अक्षय वाघमारे यांच्यात थेट सामना रंगाला. यात अक्षय ‘बिग बॉस हॉटेट’चा शेफ बनला होता तर दादूस त्याच हॉटेलमध्ये गेस्ट आला होता.

टास्कनुसार, गेस्ट म्हणून आलेल्या दादूससाठी अक्षयला एक डिश बनवायची होती. पण अशी डिश जी दादूस खाऊ शकणार नाही आणि तो स्पर्धेतून बाद होईल.  अक्षयने दादूससाठी काय बनवलं तर कारल्याचं ऑम्लेट. डोळ्यातून पाणी येईल इतकं तिखट, खाऊन ओकारी येईल इतकं मीठ आणि गरम मसाला घातलेलं हे ऑम्लेट त्यानं दादूला वाढलं. ही डिश खाणं सोपं नव्हतं. मात्र दादूसने टास्क जिंकायचाच या बाण्यानं ही डिश संपली. डोळ्यांतून पाणी वाहू लागलं, जीभ लाल झाली तरी दादूस कारल्याचं ऑम्लेट खात राहिला, ते सुद्धा हसत हसत. ते पाहून त्याच्या बाजूला बसलेल्या सर्व स्पर्धकांना अक्षरश: रडू आलं.  तृप्ती देसाई आणि सुरेखा कुडुची यांना तर धाय मोकळून रडू लागल्या.   

दादूसच्या त्रास त्यांना बघवत नव्हता.  अखेर बिग बॉसलाच दादूसचा त्रास सहन झाला नाही आणि त्यांनी तात्काळ टास्क थांबावयला सांगितला.. आणि दादूस विजयी झाला.. टास्क थांबताच स्पर्धकांचा अश्रूंचा बांध फुटला. सर्वांनी अगदी रडत रडत दादूसला मिठ्या मारल्या. अक्षय वाघमारेही भावुक झाला. त्यानेही दादूला कडकडून मिठी मारली.
एकंदर काय तर दादूसने सगळ्यांनाच रडवलं....

Web Title: bigg boss marathi season 3 updates dadus aka Santosh Chodhari made everyone cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app