ठळक मुद्देआज बिग बॉस सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची AV दाखवली जाणार आहेत... बिग बॉस मराठीतील आपला इतक्या दिवसांचा प्रवास पाहून स्पर्धक भावूक होणार हे निश्चित.

बिग बॉस मराठी 2 ची सध्या चांगलीच हवा आहे. या कार्यक्रमाचा फिनाले जवळ आला असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता सहा स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. शीव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे यांच्यामधील एकाला 1 सप्टेंबरला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 25 लाख मिळणार आहेत.


बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन पहिल्या दिवसापासून चर्चेमध्ये आहे... मग ते टास्क असो घरातील सदस्यांची भांडण किंवा स्पर्धकांतील मैत्री असो... घरामध्ये आलेल्या सदस्यांपैकी सहा सदस्य आता फिनालेमध्ये पोहचले आहेत आणि आता तो क्षण जवळ आला आहे ज्या दिवसाचे स्वप्न सदस्यांनी घरामध्ये आल्यापासून पाहिले... आजचा दिवस बिग बॉस मराठीतील सदस्यांसाठी खूप खास असणार आहे... कारण आज बिग बॉस सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची AV दाखवली जाणार आहेत... बिग बॉस मराठीतील आपला इतक्या दिवसांचा प्रवास पाहून स्पर्धक भावूक होणार हे निश्चित...

साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी ओळखली गेलेली व्यक्ती म्हणजे शीव ठाकरे या शब्दांत बिग बॉस यांनी शीवचे कौतुक केले. बिग बॉसच्या घरात प्रथम प्रवेश केला तो म्हणजे एका ग्लॅमरस आणि उत्तम अभिनेत्रीने… ती संवेदनशील, हरहुन्नरी व्यक्ती म्हणजेच किशोरी शहाणे ... किशोरी शहाणे यांच्या प्रवासाबद्दल बिग बॉस बोलत असताना किशोरी शहाणे यांच्या डोळ्यांत पाणी तरळले... “मूर्ती लहान पण कीर्ती महान” ही म्हण कोणाला लागू पडत असेल तर ते म्हणजे नेहा शितोळेला... नेहाला देखील आज तिचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास बघायला मिळणार आहे... सगळेच सदस्य प्रचंड भावुक झाले होते. या AV मुळे त्यांचा इतक्या दिवसांचा प्रवास त्यांच्या नजरेसमोरून गेला...

आजच्या बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये सगळ्याच स्पर्धकांच्या घरातील आठवणींना उजाळा दिला जाणार असून प्रेक्षकांना हा भाग आज रात्री ९.३० वाजता आपल्या कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. 


Web Title: Bigg Boss Marathi Season 2 finale: Why Bigg boss marathi 2 contestant Shiv Thakare cried a lot?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.