Bigg Boss Marathi 3: “तुम्ही प्रत्येक वेळी बोलायलाच हवं का?" सोनालीन- तृप्ती देसाईंचा वाद विकोपाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:30 PM2021-10-19T17:30:00+5:302021-10-19T17:30:00+5:30

Bigg boss marathi 3 : आज सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यात वाद होणार आहे. सोनालीचा पारा चढणार आहे.

bigg boss marathi 3 trupti desai and sonali Quarrel | Bigg Boss Marathi 3: “तुम्ही प्रत्येक वेळी बोलायलाच हवं का?" सोनालीन- तृप्ती देसाईंचा वाद विकोपाला

Bigg Boss Marathi 3: “तुम्ही प्रत्येक वेळी बोलायलाच हवं का?" सोनालीन- तृप्ती देसाईंचा वाद विकोपाला

Next
ठळक मुद्देतृप्ती देसाई आणि सोनाली यांच्यातील हा वाद पुढे कुठवर गेला? 

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या बिग बॉस मराठीच्या घरात दररोज स्पर्धकांची एकमेकांसोबत भांडण होत असतात. असा एकही दिवस नाही ज्यात स्पर्धक एकमेकांसोबत वाद घालत नाहीत. सतत या घरात काही ना काही कुरबुरी सुरु असतात. यामध्येच आता तृप्ती देसाई आणि सोनाली या दोघींमध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. भात कच्चा राहिल्यामुळे सुरु झालेला हा वाद चांगलाच टोकाला पोहोचणार आहे.

आज सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यात वाद होणार आहे. सोनालीचा पारा चढणार आहे. कारण काय तर भात कोणी वाफवावा ? सोनाली तिचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, तिला जे वाटतं ते सांगताना दिसणार आहे. पण, तृप्तीताईंचे म्हणणे आहे छोटी गोष्ट आहे वाढवण्यात काहीच अर्थ नाहीये. सोनालीचं म्हणण आहे माझी ड्युटी नाहीये तर मी का करायचे? आता हा वाद कुठवर गेला ? आजच्या भागामध्ये कळेलच.
 
"मी तुमच्याशी अजिबात वाद घातल नाहीये.  मला ज्या गोष्टी पटत नाहीत तिथे बोलणं मला गरजेचं वाटतं. गोष्ट छोटी आहे. मग उगाच तिला मोठं का करायचं? हे तुम्हीदेखील बोलू शकता. मग तिथे जाऊन बोला. तुमच्याशी वाद घालायची माझी अजिबात इच्छा नाही. ज्या गोष्टी मला खटकतात तिथे मला बोलू द्या. तुम्ही मला बोलूच देत नाही. सकाळची ड्युटी माझी नाही. त्यामुळे मी हे काम करणार नाही.  तुम्ही प्रत्येक वेळी बोलायलाच हवं का?" असं सोनाली म्हणते.

 “वाद नाहीये हा, छोटी गोष्ट आहे. दोन्ही बाजूने ताणल गेलं तर तर वाद वाढणारच ना सोनाली. वाद घालण्यापेक्षा सामंजस्याची भूमिका घ्या. भांडायची गरज नाही. भात तुमच्याकडून कच्चा राहिला ना? मग फेकून द्या म्हणजे? हे चुकीचं आहे. विनाकारण बडबड सुरु आहे, " असं तृप्ती देसाई सोनालीला म्हणतात.

दरम्यान, तृप्ती देसाई आणि सोनाली यांच्यातील हा वाद पुढे कुठवर गेला? तृप्ती देसाई कॅप्टन असल्याने त्या दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, सोनालीला कसला तरी राग आल्याने तिचा पारा भलताच चढला आहे आणि ती कुणाचंचं ऐकून घ्यायला तयार नाहीये. स्नेहाने देखील सांगितले विषय दुसरीकडे जातो आहे. तरी हा वाद थांबला नाही. त्यामुळे आजच्या भागात या दोघींच्या भांडणाचं काय होतं याचा उलगडा होईल.
 

Web Title: bigg boss marathi 3 trupti desai and sonali Quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app