Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep:'महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला'; सोनाली पाटीलने तृप्ती देसाईंना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 06:44 PM2021-09-25T18:44:56+5:302021-09-25T18:45:39+5:30

बिग बॉसच्या घरात आता सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे पहायला मिळाले.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep: 'Women, Women and the Hunter Number One'; Sonali Patil slammed Trupti Desai | Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep:'महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला'; सोनाली पाटीलने तृप्ती देसाईंना लगावला टोला

Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep:'महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला'; सोनाली पाटीलने तृप्ती देसाईंना लगावला टोला

Next

बिग बॉस मराठीचे तिसरे सीझन सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असले तरी बिग बॉसच्या या घराची खूप चर्चा होताना दिसते आहे. पहिल्या दिवसापासून सुरू झालेला वादाचा सिलसिला पाचव्या दिवशीही पाहायला मिळत आहे.बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. घरात प्रवेश केल्याच्या पहिल्याच दिवशी मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांच्यासोबत वाद झाले होते. त्यानंतर आता सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे पहायला मिळाले.

तृप्ती देसाई अभिनेत्री सोनाली पाटीलवर चिडलेल्या दिसल्या. त्या तिला म्हणाल्या की ‘माझ्याशी असे बोलायचे नाही, नीट बोलायचे. यानंतर सोनाली देखील त्यांच्याशी भांडताना दिसली. यावेळी तिने महिला हा मुद्दा उचलून धरला होता. या महिलांच्या हक्कांसाठी भांडतात आणि इथे महिलांवरच कुरघोडी करतात अशा आशयाचे बोल बोलत ‘महिला, महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला…’ असा टोलादेखील सोनाली पाटीलने तृप्ती देसाई यांना लगावला.

महेश मांजरेकर कोणाला लगावणार खडेबोल...
आज विकेंड्सच्या चावडीवर महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेणार आहेत. त्यांनी मीराची चांगलीच शाळा घेतली. ते म्हणाले की, गायत्री तू मीरा काय बोलली की तिच्या मागे गुबूगुबू करत असते आणि दादूसला हॅट्सऑफ केले. मीरा तुला का नाही वाटलं दादूस जिंकणार. काय कठीण आहे बनवणे की खाणे. मी तुला ते खायला घालतो असे महेश मांजरेकर बोलल्यावर मीरा बोलायला लागली. तर महेश मांजरेकर आणखी भडकले आणि तिला म्हणाले की आधी ऐकायला शिक. ‘बिग बॉसच्या चावडीवर’ महेश मांजरेकर मीराशिवाय आणखी कुणाची शाळा घेणार हे देखील पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

https://www.lokmat.com/television/bigg-boss-marathi-3-gayatri-datar-relationship-a603/

यंदाचे १५ स्पर्धक
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep: 'Women, Women and the Hunter Number One'; Sonali Patil slammed Trupti Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app