Bigg Boss Marathi 3: गायत्री दातार रिलेशनशीपमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:21 PM2021-09-25T16:21:41+5:302021-09-25T16:22:11+5:30

बिग बॉसच्या घरात आता गायत्री दातार बऱ्यापैकी रुळली आहे.

Bigg Boss Marathi 3: In Gayatri Datar Relationship? | Bigg Boss Marathi 3: गायत्री दातार रिलेशनशीपमध्ये?

Bigg Boss Marathi 3: गायत्री दातार रिलेशनशीपमध्ये?

Next

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला 'बिग बॉस' सिझन ३ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्री दातारचाही यात समावेश आहे. गायत्री या घरात आता बऱ्यापैकी रुळली असून तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गायत्री सध्या प्रेमात पडली आहे. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गायत्री कोणाच्या प्रेमात पडली आहे? तिच्या प्रियकराचे नाव ऐकाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खुद्द बिग बॉस हे तिचे प्रियकर आहेत. बसला ना आश्चर्याचा धक्का? परंतु ही गोष्ट खरी आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रियकराबरोबर प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे. बिग बॉससमोर ती चक्क लाजतेय, त्यांच्यावर रुसतेय. आता गायत्रीचा प्रियकर तिचा हा प्रस्ताव मान्य करणार का, हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता  आहे.


'तुला पाहते रे' या मालिकेमुळे गायत्री दातारला ओळख मिळाली. या मालिकेत गायत्रीने ईशाची भूमिका साकारली होती आणि या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना भावली होती. मुंबईत जन्मलेल्या गायत्रीचे सर्व शिक्षण पुण्यात झाले आहे. लहानपणापासूनच गायत्रीला अभिनयाची आणि नृत्याची आवड होती. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावरही तिने आपली आवड जोपासली.

गायत्रीने तुला पाहते रे मालिकेशिवाय चला हवा येऊ द्या शोमध्येदेखील काम केले आहे. तसेच तिने कोल्हापूर डायरिज या चित्रपटातही काम केले आहे. आता गायत्री 'बिग बॉस मराठी ३' च्या घरात कशा पद्धतीने स्वतःचे स्थान बनवते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3: In Gayatri Datar Relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app