Bigg Boss Marathi 2: Vaishali Made blame on Surekha Puneker of Papaya theft, see this video of this matter | बिग बॉस मराठी २ : वैशाली माडेने सुरेखा पुणेकरांवर लावला चोरीचा आरोप, पहा या प्रकरणाचा व्हिडिओ
बिग बॉस मराठी २ : वैशाली माडेने सुरेखा पुणेकरांवर लावला चोरीचा आरोप, पहा या प्रकरणाचा व्हिडिओ

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्यांचे वाद वाढत चालले आहेत. कधी कधी शुल्लक गोष्टीवरून हे सदस्य वाद करतात. एका सदस्याला चुकीचे दाखविण्यासाठी, अथवा आपल्या टीममधील सदस्य कसा बरोबर आहे, त्याचे समर्थन करण्यसाठी सगळेच एकमेकांशी भांडायला लागतात. तसे बघायला गेले तर सुरेखाताईचे इतर सदस्यांबरोबर वाद नाही झाले. वीणा आणि अभिजीत बिचुकले सोडले तर तसा त्यांचा लक्षात राहील असा वाद वा भांडण क्वचितच आठवते. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये त्यांची नेहा बरोबर देखील थोडी बाचाबाची झाली.


आज बिग बॉस मराठी घरामध्ये रंगणार आहे वेगळा टास्क ज्यामध्ये सदस्यांची विभागणी दोन टीम्समध्ये केलेली आहे... BB हॉटेल या टास्कमध्ये वैशाली आणि सुरेखाताईनी मध्ये वाद होणार आहे. पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.


ज्यामध्ये वैशालीचे म्हणणे आहे सुरेखाताईनी तिने ठेवलेली पपई घेतली... सुरेखाताई म्हणाल्या, मी अर्धी घेतली तू अर्धी घे ... तर वैशालीचे म्हणणे म्हणणे पडले मला अर्धी चालणार नाही ... हे भांडण होत असताना नेहा देखील आली आणि तिने देखील सुरेखाताईना सांगितले कि, ती पपई आम्ही आधीच घेतली होती, तुम्हांला हवी होती तर आधी का नाही घेतली. नेहा आणि वैशाली दोघांनीही त्यांना सांगितले कि, परत द्या त्यावर सुरेखाताई म्हणाल्या “मी नाही देणार, तुम्हांला काय करायचे ते करा”. त्यावर वैशाली म्हणाली “ही चोरी आहे, आणि मला हे मान्य नाही”.


Web Title: Bigg Boss Marathi 2: Vaishali Made blame on Surekha Puneker of Papaya theft, see this video of this matter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.