Bigg Boss Marathi 2 : नेहा शितोळेसोबत गैरवर्तन, पराग कान्हेरेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 10:13 AM2019-06-28T10:13:23+5:302019-06-28T10:14:06+5:30

सर्वप्रथम बिग बॉसच्या घरातील स्पर्धक शिवानी सुर्वेने या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकलेचे अटक नाट्य गाजले. आता बिग बॉस मराठीचा स्पर्धक पराग कान्हेरे यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 2 : parag kanhere throwed out of the house | Bigg Boss Marathi 2 : नेहा शितोळेसोबत गैरवर्तन, पराग कान्हेरेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी!!

Bigg Boss Marathi 2 : नेहा शितोळेसोबत गैरवर्तन, पराग कान्हेरेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी!!

ठळक मुद्दे बिग बॉस मराठीचे दुसरे सीझन लोकांच्या पसंतीत उतरले आहे. पण यावेळी नॉमिनेशनशिवाय अन्य कारणांमुळे अधिक स्पर्धक घराबाहेर पडत आहेत.

बिग बॉस मराठी 2’च्या घरातील राडा सुरुच असताना या शोच्या चाहत्यांना आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. सर्वप्रथम बिग बॉसच्या घरातील स्पर्धक शिवानी सुर्वेने या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकलेचे अटक नाट्य गाजले. आता बिग बॉस मराठीचा स्पर्धक पराग कान्हेरे यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. होय, सहस्पर्धक नेहा शितोळे हिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.


शेफ म्हणून बिग बॉसच्या घरात मिरवणारा पराग पहिल्याच दिवसांपासून चर्चेत होता. रूपाली भोसले हिच्यासोबतचा बिग बॉसच्या घरातील त्याचा रोमान्स चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. हा रोमान्स भरात येण्याआधीच परागला घरातून बाहेर काढण्यात आले. बिग बॉसने स्पर्धकांना ‘टिकेल तो टिकेल’ हा टास्क दिला होता.  

या कार्यात दोन टीम करण्यात आल्या होत्या. यात घरातील अंगणात एक मोठे सिंहासन ठेवले होते. बझर वाजल्यानंतर टीममधील एक सदस्य सिंहासनावर मुद्रावस्थेत बसायचे होते. त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्या बाजूला त्याच्याच टीममधील एक सदस्य उभा राहणार होता. दुस-या प्रतिस्पर्धी टीमने बझर वाजण्यापूर्वी मुद्रावस्थेत बसलेल्या सदस्याला लवकरात लवकर सिंहासनावरून हटवण्याचा प्रयत्न करायचा होता.  त्यानुसार पराग हा सिंहासनावर बसलेला असताना त्याला सिंहासनावरुन उठवण्यासाठी नेहा परागला मेकअप करते. त्याच दरम्यान घरात अवघ्या काही दिवसांपूर्वी आलेल्या हिना आणि शिवमध्ये जोरदार वाद होतो. तर दुसरीकडे परागला सिंहासनावरुन खाली खेचण्यासाठी वैशाली, नेहा आणि अभिजीत जोरदार प्रयत्न करतात. या सर्व प्रयत्नात पराग नेहाच्या अंगावर पडतो.या टास्कदरम्यान परागला  इतका राग येतो की, तो नेहाच्या कानशीलात लगावतो. सोबतच तिच्यासोबत गैरवर्तन करतो.

 बिग बॉस मराठीचे दुसरे सीझन लोकांच्या पसंतीत उतरले आहे. पण यावेळी नॉमिनेशनशिवाय अन्य कारणांमुळे अधिक स्पर्धक घराबाहेर पडत आहेत. आधी शिवानी सुर्वे, मग अभिजीत बिचुकले आणि यापाठोपाठ आता पराग कान्हेरे असे तीन स्पर्धक नॉमिनेशनशिवाय बिग बॉसच्या घराबाहेर पडले आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi 2 : parag kanhere throwed out of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.