ठळक मुद्देहा 29 सप्टेंबरला करूया... सगळ्यांना बोलवूया... ज्‍यांना वाटलं यावंसं ते येतील आणि ही पार्टी कार्यक्रम संपल्यावर महिन्याभरात झाली तरच होईल असे मला वाटते. खरे तर या पार्टीला सगळ्यांनी यावं असे मला वाटते.'

नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांची फायनलिस्‍ट म्‍हणून निवड होण्‍यासह बिग बॉस आता फिनाले आठवड्याकडे मार्गक्रमण करत आहे. स्‍पर्धक आणि प्रेक्षकांची सुद्धा उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे... विजेता जाणण्‍यासाठी आपण देखील अत्‍यंत उत्‍सुक आहोत. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये नेहा आणि आरोह शो संपल्‍यानंतरच्‍या पार्टीची योजना आखताना दिसत आहेत. 

''माझ्या बाबांचा 'कभी खुशी कभी गम' मूव्‍ही मधील डायलॉग आवडता होता... 'मेन्यू किसी अच्‍छे दिन याद करीयो.' त्यामुळे त्‍यांच्‍या बर्थडेला मी मज्‍जा करते, पार्टी करते. आता 29 सप्‍टेंबरला त्यांचा बर्थडे आहे... त्यामुळे मी बाहेर गेल्‍यावर पार्टी करणार आहे'' असे नेहा म्‍हणते आणि यासाठी आरोह तिचे कौतुक करतो. 


 
नेहा बिग बॉस मराठी संपल्यानंतर एकत्र पार्टी करण्याविषयी आरोहला विचारते. त्यावर आरोह म्हणतो, ''हा 29 सप्टेंबरला करूया... सगळ्यांना बोलवूया... ज्‍यांना वाटलं यावंसं ते येतील आणि ही पार्टी कार्यक्रम संपल्यावर महिन्याभरात झाली तरच होईल असे मला वाटते. खरे तर या पार्टीला सगळ्यांनी यावं असे मला वाटते.'' पार्टीच्‍या स्‍थळाबाबत नेहा म्‍हणते, ''माझीही इच्‍छा आहे सगळ्यांनी यावे... पण प्रत्येकाने ठरवावे त्याला यायचे आहे की नाही. आपण 29 सप्‍टेंबरला पार्टी प्‍लान करूया पुण्‍यात! पण मला वाटतंय की मुंबईतच करावं कारण लोकांना यायला सोपं पडेल!'' 

''मुंबईत लिमिटेशन्‍स आहेत, एक तर एवढं मोठं घर जिथे १० लोकं एकत्र बसून एन्‍जॉय करू शकतील असे पाहिजे... पार्टीत खूप एन्‍जॉय करायचं असेल तर बंगलाच पाहिजे किंवा अशी कुठली जागा जिथे तुम्‍ही नाचू शकता, ओरडू शकता. फ्लॅटमध्‍ये थोडा जरी आवाज झाला तरी खालच्‍या फ्लोअरवाले कम्‍प्‍लेंट करतात,'' असे आरोह म्‍हणतो. त्यावर मुंबईतील मढ आयलंड हे ठिकाण योग्‍य असल्‍याचे त्या दोघांचे बोलणे होते. सर्वांच्‍या दृष्‍टीने ते सोयीचे ठिकाण असल्‍याबाबत त्या दोघांचे एकमत होते. 

बिग बॉस मराठी फिनाले संपला नसला तरी फिनाले नंतरच्या पार्टीची तयारी तर आताच सुरू झाली आहे असेच म्हणावे लागेल. 

Web Title: Bigg Boss Marathi 2: neha shitole and aaroh velankar making party plans after bigg boss marathi 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.