या अभिनेत्रीने एकेकाळी गाजवली आहे मराठी चित्रपटसृष्टी, नुकतीच दिसली होती एका रिॲलिटी शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 12:30 PM2019-09-02T12:30:00+5:302019-09-02T12:30:02+5:30

या गोंडस मुलीचा फोटो पाहून ही मुलगी कोण आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल

Bigg boss marathi 2 contestants kishori shahane childhood picture | या अभिनेत्रीने एकेकाळी गाजवली आहे मराठी चित्रपटसृष्टी, नुकतीच दिसली होती एका रिॲलिटी शोमध्ये

या अभिनेत्रीने एकेकाळी गाजवली आहे मराठी चित्रपटसृष्टी, नुकतीच दिसली होती एका रिॲलिटी शोमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देकिशोरी शहाणे यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले.

कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. ते आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपले चित्रीकरणादरम्यानचे फोटो, खाजगी आयुष्यातील फोटो पोस्ट करत असतात. तसेच ते कुठे फिरत आहेत, काय करत आहेत याविषयी त्यांच्या चाहत्यांना सांगत असतात. अनेकवेळा त्याच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे लहानपणीचे देखील फोटो पाहायला मिळतात. 



या गोंडस मुलीचा फोटो पाहून ही मुलगी कोण आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना... या मुलीने मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला असून ती आजही चित्रपट, मालिकांमध्ये काम करते. ती नुकतीच बिग बॉस मराठी 2 या रिॲलिटी शोमध्ये आपल्याला दिसली होती. तिने या कार्यक्रमात फायनलपर्यंत मजल मारली होती. आम्ही कोणाविषयी बोलत आहोत हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आले असेलच... बरोबर आम्ही किशोरी शहाणे यांच्याविषयीच बोलत आहोत. किशोरी यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांचा हा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पाहून त्या आज इतक्याच लहानपणी देखील सुंदर दिसायच्या, असेच आपल्याला म्हणावे लागेल. 



किशोरी शहाणे शाळेत असताना त्यांनी 'दुर्गा झाली गौरी' या नृत्यनाटिकेत काम केले होते. त्‍यानंतर मग राज्यस्तरीय नाटक स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्याचदरम्यान त्यांनी वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शतुरमुर्ग' या हिंदी नाटकात काम केले. असे करता करता मग 'मोरूची मावशी' या व्‍यावसायिक नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. त्यानंतर ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सचिन पिळगावकर यांच्या ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटात काम केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले असून त्यांची जोडी विशेष करून अशोक सराफ यांच्यासोबत गाजली. 


किशोरी शहाणे यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. तसेच अनेक हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले. 

 

Web Title: Bigg boss marathi 2 contestants kishori shahane childhood picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.