ठळक मुद्देवीणाच्या बोलण्याचा शीवला राग येणार असून तो रागातच वीणाला उलटे उत्तर देणार आहे. तो म्हणणार आहे की, “तुझे इतकं घाणेरडं अ‍ॅटीट्यूड आहे का की, मी सेफ झालो त्याचा प्रॉब्लेम आहे?” वीणाला यामुळे वाईट वाटणार आहे

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहेमीच चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे वीणा आणि शीव... घरामध्ये या दोघांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही. जिथे वीणा तिथे शीव असे सहसा आपल्याला दिसते... महेश मांजरेकरांनी देखील WEEKEND चा डाव मध्ये वीणा याचा कंटाळा येत नाही का? आता खेळाकडे लक्ष द्या असे शीवला सल्ला दिला.

आता यानंतर या आठवड्यामध्ये दोघांमध्ये काही बदल दिसतोय की नाही हा मोठा प्रश्न पडणार आहे. पण आज वीणा आणि शीवमध्ये वाद होणार आहेत... शीवच्या बोलण्याने वीणा दुखावली जाणार असून ती तिच्या भावना किशोरी शहाणे यांच्या जवळ व्यक्त करणार आहे.

खरं तर दर आठवड्याला या घरामधील समीकरण बदलत असते... नाती बदलतात... पण नाती कशी टिकवून ठेवायची हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून असते... वीणा शांत आहे हे बघून शीव तिला विचारणार आहे की, काय झाले? पण त्यावर वीणा काहीच नाही असे त्याला सांगणार आहे. त्यावर शीव काय प्रॉब्लेम आहे? मला सांग... असे सतत तिला विचारणार आहे. त्यावर वीणा त्याला म्हणणार आहे की, जरा हळू आवाजात बोल... माझं खूप डोकं दुखत आहे... वीणाच्या असे बोलण्याचा शीवला राग येणार असून तो रागातच वीणाला उलटे उत्तर देणार आहे. तो म्हणणार आहे की, “तुझे इतकं घाणेरडं अ‍ॅटीट्यूड आहे का की, मी सेफ झालो त्याचा प्रॉब्लेम आहे?” वीणाला यामुळे वाईट वाटणार आहे आणि ती झालेला प्रकार किशोरी शहाणे यांना सांगणार आहे. 

हे सगळे ऐकून असं शीव का म्हणाला असा प्रश्न किशोरी यांना देखील पडणार आहे. त्यानंतर वीणा त्यांना सांगणार आहे की, महेश सर देखील म्हणाले तू नेहेमी विरुद्ध टीमला पाठिंबा देते... मी शीवला पाठिंबा देत होते... कारण शीव मागील आठवड्यापासून खूप अस्वस्थ होता. मी प्रत्येक टास्क प्रामाणिकपणे खेळते. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप मी सहन करणार नाही. माझ्या मनाला काही गोष्टी खूप लागल्या आहेत. मी घरी जायला तयार आहे... पण मी असे आरोप सहन करणार नाही.”

Web Title: bigg boss marathi 2 contestant veena jagtap and shiv thakre had big fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.