ठळक मुद्देजान तेरे नाम, सैलाब या चित्रपटांना एकेकाळी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक बलराज वीज यांनी केले होते. ते किशोरी शहाणे यांचे पती असून किशोरी आणि दीपक यांचा प्रेमविवाह झाला होता.

किशोरी शहाणे यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या हिंदी मालिकांमधील भूमिका देखील चांगल्याच गाजल्या आहेत. त्या सध्या बिग बॉस मराठीच्या घरात असून बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमाच्या विजेतेपदाच्या त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

किशोरी शहाणे या गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांना चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांच्या फॅन्सना नेहमीच इच्छा असते. तुम्हाला माहीत आहे का, किशोरी शहाणे यांचे लग्न एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत झाले असून त्यांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचे नाव बॉबी असून तो सध्या मॉडलिंग क्षेत्रात करियर करत आहे. 

जान तेरे नाम, सैलाब या चित्रपटांना एकेकाळी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक बलराज वीज यांनी केले होते. ते किशोरी शहाणे यांचे पती असून किशोरी आणि दीपक यांचा प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांची ओळख अभिनेता जॅकी श्रॉफमुळे झाली होती. किशोरी यांनीच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या प्रेमकथेविषयी सांगितले होते. जॅकीमुळेच आमच्या प्रेमकथेला सुरुवात झाली असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी सांगितले होते की, एका चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि दीपक भेटलो होतो. जॅकी हा माझा आणि त्यांचा दोघांचाही खूप चांगला फ्रेंड आहे. दीपक एका हिंदी चित्रपटावर काम करत असून ते एका मराठी अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे जॅकीने मला सांगितले आणि त्यानेच एका चित्रपटाच्या सेटवर आमची ओळख करून दिली. दीपक यांच्यासोबत काम करताना आमच्या दोघांमध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही दोघे कामात कितीही व्यग्र असलो तरी कामात आणि खाजगी आयुष्यात नेहमीच ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. 

किशोरी यांनी दीपक यांच्या हफ्ता बंद या चित्रपटात काम केले होते. तो किशोरी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्या चित्रपटात त्यांची भूमिका सहाय्यक अभिनेत्रीची असली तरी त्या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. 

Web Title: Bigg Boss marathi 2 contestant kishori shahane and deepak balraj vij love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.