लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा दुसऱ्या सीझनने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदाच्या सीझनमध्ये शिव ठाकरे व वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप चर्चेत आली. त्यामुळे सीझनमध्ये शेवटच्या तीन सदस्यांमध्ये वीणा व शिव होते आणि या सीझनचा शिव विजेता ठरला. सीझन संपल्यानंतर शिव व वीणाचा रोमान्स संपेल, असं बोललं जातं होतं. मात्र तसं काही झालं नाही. उलट, त्या दोघांचं नातं बहरत चाललं आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही खूप खूश आहेत. त्यात आता त्यांचे चाहते त्यांची तुलना बॉलिवूडच्या कपलसोबत करत आहेत. 

शिव व वीणा यांच्या फॅन्स पेजवर शिव व वीणा यांची तुलना बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलसोबत केली जात आहे. या दोघांच्या फोटोंसोबत बॉलिवूडच्या जोडप्यांचा फोटोंची तुलना करणारी पोस्ट फॅन्स पेजवर पहायला मिळतेय. वीणाच्या फॅन पेजवर भारतातील प्रेमळ जोडपं म्हणत स्पोर्ट्स क्षेत्रात विराट कोहली व अनुष्का शर्मा, बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग व दीपिका पादुकोण आणि मराठी चित्रपटसृष्टीत शिव ठाकरे व वीणा जगताप अशी तुलना केलेला फोटो पहायला मिळतो आहे. 


नुकताच वीणाने शिवसोबतचा फ्लाईटमधील फोटो शेअर केला आहे. ज्यात शिव झोपलेला दिसतो आहे आणि या फोटोला कॅप्शन देत वीणानं म्हटलं की, बडी लंबी गुफ्तगू करनी है तुमसे, तुम अपना एक पूरी जिंदगी लेकर.


वीणाने शिवला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनोखं गिफ्ट दिलं तेही अॅडव्हान्समध्ये. वीणानं शिवच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढला. तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 


इतकेच नाही तर वीणा शिवच्या आईलादेखील भेटली. त्यांच्या भेटीचा फोटो शिवनं इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात आता वीणानं त्या दोघांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 


वीणानं शिव व तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शिवच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्यावेळचा आहे. त्या दोघांचा फोटो शेअर करत वीणानं म्हटलं की, राधा प्रेम रंगी रंगली.

शिव व वीणा दोघे लग्न करणार का हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.


 

Web Title: Bigg Boss Marathi 2: Compare Shiva-Veena with this famous Bollywood couple, Learn about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.