बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना रोज नवनवीन आव्हानं, कठीण कार्य बिग बॉस सोपवत असतात. आज देखील असेच काहीसे घरामध्ये घडणार आहे. अभिजीत केळकर स्टोअर रूममध्ये गेला आणि त्या रूममधून अचानक गायब झाला. इतर सदस्यांना याची काहीच कल्पना नाही. तो अचानक कुठे गेला ? त्याला कोण घेऊन गेलं ? हे आजच्या भागामध्ये कळेलच.


या घटनेनंतर बिग बॉसनी घरामध्ये एक घोषणा केली, बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना सावधानतेचा इशारा देत आहेत. आज बिग बॉसच्या घरावर एक संकट आलेलं आहे, घरातील सदस्यांविरुद्ध एक मोठा कट रचण्यात आला आहे आणि याची सुरुवात अभिजीत केळकर यांच्या गायब होण्यापासून झाली आहे. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी सतर्क राहणं अत्यंत गरजेचे आहे.


आता अभिजीत केळकर कुठे गेला ? कधी परतणार ? मर्डर मिस्ट्री या टास्कचाच हा भाग आहे की अजून काही ? बिग बॉस मराठी सिझन २ च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर पहा.


नुकताच घरामध्ये कॅप्टनसी टास्क रंगला आणि त्यामध्ये रुपालीने बाजी मारली आणि घराची नवी कॅप्टन बनली. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आगळावेगळा टास्क रंगणार आहे. बिग बॉसच्या घरावर एक मोठे संकट आले असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी बिग बॉस सदस्यांवर मर्डर मिस्ट्री हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत.


या कार्यानुसार बिग बॉस मराठीच्या घरात सांकेतिक खून होणार आहे. प्रत्येक बजरला खून झालेला सदस्य कॅप्टनपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडेल. शेवटच्या बजरनंतर खुनापासून वाचलेल्या सदस्याला कॅप्टन पदाच्या शर्यतीत फायदा होईल असे बिग बॉसनी जाहीर केले.

बिग बॉसने  नेहा आणि शिवला या कार्यामध्ये काय व्हायला आवडेल खुनी कि सामान्य नागरिक असे विचारले यावर नेहा आणि शिवने खुनी व्हायला आवडले असे उत्तर दिले. 


Web Title: Bigg Boss Marathi 2: Abhijit Kelkar was missing from house?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.