The Bigg Boss contestant Sakshi Pradhan did a pregnancy test on the show | Bigg Bossच्या घरात प्रेग्नंट झाली होती 'ही' स्पर्धक, धरावा लागला होता बाहेरचा रस्ता

Bigg Bossच्या घरात प्रेग्नंट झाली होती 'ही' स्पर्धक, धरावा लागला होता बाहेरचा रस्ता

बिग बॉस सगळ्यात वादग्रस्त शो समजला जातो. या शोमध्ये घडणा-या प्रत्येक घडामोडी पाहण्यास रसिकही उत्सुक असतात. या घरात सहभागी होणा-या स्पर्धकांचीही तुफान चर्चा रंगते. अशीच एक स्पर्धक जी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होती.  मासिक पाळी न आल्याने अनवाँटेड प्रेग्नेंसीची भीतीसाक्षी प्रधानला सतावत होती. त्यावेळी इतर स्पर्धकांनाही तिने तिच्या प्रेग्नंसी बाब सांगितली होती.  मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचे म्हणणे काही वेगळेच होते. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने प्रेग्नेंसीची बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. ती म्हणाली होती, मी आता फक्त 21 वर्षांची आहे. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी प्रेग्नेंट कशी असू शकते.साक्षी प्रधान 'स्प्लिट्सविला' या डेटिंग रिअॅलिटी शोच्या दुस-या पर्वाची विजेती आहे.

 

इतकेच नाही तर तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या व्हिडिओत साक्षी एका तरुणासोबत इंटीमेट होताना दिसली होती. याच कॉन्ट्रोव्हर्सीमुळे साक्षीला बिग बॉस या शोची ऑफर मिळाली होती. बिग बॉसमध्ये साक्षी अभिनेता अश्मित पटेलला पॉप्स म्हणून हाक मारायची. स्वतःला ती अश्मितची मुलगी म्हणायची.

अब शादी का कोई चान्स नहीं...! सलमान खानच्या लग्नाबद्दल ज्योतिषाची भविष्यवाणी

‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणा-या या दोन स्पर्धकांचे भविष्य सांगण्यासाठी जनार्दन नावाचे एक ज्योतिषी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सेटवर अवतरले. ज्योतिषी जनार्दन यांनी सर्वप्रथम एजाज व निक्की यांचे भविष्य सांगितले. निक्की दिसायला साधीभोळी असली तरी ती अतिशय चाणाक्ष मुलगी आहे. ती करिअरमध्ये खूप पुढे जाईल, असे ज्योतिषी जनार्धन यांनी सांगितले. एजाजला मात्र त्यांनी सल्ला दिला. स्वत:चे मन म्हणेल ते कर, ‘बिग बॉस’च्या घरात कोणी भडकवले तरी शांत राहा. रागाच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नकोस, असे त्यांनी सांगितले. पण काही कारणास्तव ते झाले नाही. पण आता बिल्कूल चान्स नाही, असे जनार्दन म्हणाले. त्यांचे उत्तर ऐकून सलमान आणखी जोरजोरात हसू लागला. अरे वाह, लग्नाचा चान्सस नाही, असे तो म्हणाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Bigg Boss contestant Sakshi Pradhan did a pregnancy test on the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.