bigg boss 14 salman khan asks astrologer if there is a chance of his wedding-now-know-what-he-says | Bigg Boss 14: अब शादी का कोई चान्स नहीं...! सलमान खानच्या लग्नाबद्दल ज्योतिषाची भविष्यवाणी

Bigg Boss 14: अब शादी का कोई चान्स नहीं...! सलमान खानच्या लग्नाबद्दल ज्योतिषाची भविष्यवाणी

ठळक मुद्देबिग बॉस 14 ची प्रतीक्षा अखेर संपली. काल शोचा होस्ट सलमान खानसोबत ‘बिग बॉस’चा  ग्रँड प्रीमिअर रंगला आणि ग्रँड प्रीमिअरसह ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार, यावरून पडदा हटला.

बिग बॉस 14 ची प्रतीक्षा अखेर संपली. काल शोचा होस्ट सलमान खानसोबतबिग बॉस’चा  ग्रँड प्रीमिअर रंगला आणि ग्रँड प्रीमिअरसह ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार, यावरून पडदा हटला. सोबत ‘बिग बॉस’च्या ग्रँड प्रीमिअरमध्येच आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे आता सलमानच्या लग्नाचा काहीही चान्स नाही. होय, एका ज्योतिषाने सलमानच्या लग्नाबद्दल ही भविष्यवाणी केली.
तर त्याचे झाले असे की, ‘बिग बॉस’च्या ग्रँड प्रीमिअरमध्ये सर्वप्रथम अभिनेता एजाज खान व निक्की तांबोळी या दोघांची एन्ट्री झाली. ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणा-या या दोन स्पर्धकांचे भविष्य सांगण्यासाठी जनार्दन नावाचे एक ज्योतिषी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सेटवर अवतरले.

ज्योतिषी जनार्दन यांनी सर्वप्रथम एजाज व निक्की यांचे भविष्य सांगितले. निक्की दिसायला साधीभोळी असली तरी ती अतिशय चाणाक्ष मुलगी आहे. ती करिअरमध्ये खूप पुढे जाईल, असे ज्योतिषी जनार्धन यांनी सांगितले. एजाजला मात्र त्यांनी सल्ला दिला. स्वत:चे मन म्हणेल ते कर, ‘बिग बॉस’च्या घरात कोणी भडकवले तरी शांत राहा. रागाच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नकोस, असे त्यांनी सांगितले.

एजाज व निक्कीचे भविष्य ऐकल्यानंतर सलमानला स्वत:बद्दल जाणून घ्यायचा मोह आवरता आला नाही. ज्योतिषी जनार्दन यांना त्यानेही स्वत:चे भविष्य सांगण्याची गळ घातली. सहा वर्षांपूर्वी माझे लग्न होणार, असे तुम्ही सांगितले होते. पण ते काही झाले नाही, असे सलमान हसत हसत म्हणाला. सोबत आता काही योग नाही का? असा सवालही त्याने जनार्दन यांना केला. यावर जनार्दन यांनी भाईजानच्या लग्नाबद्दलही भविष्यवाणी केली. तुझे लग्न होणार होते. पण काही कारणास्तव ते झाल ेनाही. पण आता बिल्कूल चान्स नाही, असे जनार्दन म्हणाले. त्यांचे उत्तर ऐकून सलमान आणखी जोरजोरात हसू लागला. अरे वाह, लग्नाचा चान्सस नाही, असे तो म्हणाला.

 प्रत्येक सीझन प्रमाणेच बिग बॉस 14 चे सूत्रसंचालन देखील सलमान खानच करणार आहे. या शोमध्ये यंदा स्पर्धकांसोबत बिग बॉसचे जुने स्पर्धकही दिसणार आहेत. त्यामुळे यावेळीचे बिग बॉस जास्त खास असणार आहे. 
रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, एजाज खान, जॅस्मिन भसीन, निकिता तांबोली, निशांत मलकानी, शहजाद देओल, सारा गुरपाल, जान कुमार शानू, पवित्रा पुनिया, राहुल वैद्य यांनी आतापर्यंत घरात प्रवेश केला आहे. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान तुफानी सीनियर्स म्हणून 14 दिवसांसाठी बिग बॉसच्या या सीझनमध्ये दिसतील. सिद्धार्थ शुक्ला 13 व्या सीझनचा व्हिनर आहे. तर हिना खान 12 ची फर्स्ट रनअप आहे. सिद्धार्थ शुक्लाकडे बेडरूमचा, तर गौहर खानचा किचनवर कंट्रोल असेल. स्पर्धकांच्या पर्सनल गोष्टी हिनाच्या ताब्यात असतील. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss 14 salman khan asks astrologer if there is a chance of his wedding-now-know-what-he-says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.